जनतेचे समस्या सोडवण्यासाठी चालतं फिरतं जनहित केंद्र - संजय खाडे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : वणी येथे "चालतं फिरतं जनहित केंद्र" सुरू केल्यानंतर जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आज बुधवारी मारेगाव तालुक्यात काँग्रेस नेते संजय खाडे यांनी दौरा सुरू केला आहेत. यादरम्यान, मच्छिन्द्रा येथे भेट देऊन शेतकऱ्यासह नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. 

यावेळी जयसिंग गौरकार, संचालक रवि धानोरकर, माजी सरपंच तेजराज बोढे (गणेशपूर), अमोल कुमरे, नगरसेवक नंदेश्वर आसुटकर, धीरज डांगाले, शामसुंदर मेश्राम ग्राम. पं सदस्य, गजानन कुमरे, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

सध्या योजनेत नागरिकांना ऑनलाईन कामात अडचणी येत असलेल्या त्या सर्व समस्या अडचणी 'चालतं फिरतं जनहित केंद्रात समस्या ह्या गावात जाऊन सोडवल्या जातील अशी ग्वाही देत आपण दौरे सुरू केला आहेत. विठ्ठल बापूराव लांबट ह्या शेतकऱ्याचे वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे पुर्णतः नुकसान झाले होते. त्यामुळे ते खूप मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले होते. नैसर्गिक आपत्ती विभागातून मिळणाऱ्या मोबदल्याबद्दलची प्रक्रिया खूप क्लिष्ट असल्याकारणाने त्यांना याबद्दलची माहिती सुद्धा नव्हती. त्यामुळे त्या शेतकऱ्याने संजय खाडे यांच्याकडे आपली व्यथा मांडली. श्री.खाडे यांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेतली व स्वतः संजय खाडे यांनी त्यांच्या मच्छिन्द्रा येथील घरी जाऊन त्यांची भेट घेतली. केंद्रा"मार्फत त्यांच्या घरी जाऊन शेतकऱ्याचे आधार प्रमाणीकरण करून देण्यात आले आणि त्यांना 14400 रू. एवढा लाभ मिळवून देण्यात आला. पुढे काही अडचण आलीस तर संपर्क साधण्याचे सांगितले. 

यावेळी ग्रा. पं.सदस्य नथू गेडाम, कमलाकर सोयाम, ऋषी मत्ते, विलास जाधव, उमेश क्षीरसागर, विठ्ठल लांबट, अविनाश किनाके, गोविंदा डोंगे, नरेश बरडे,आदींसह गावातील आजी-माजी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनतेचे समस्या सोडवण्यासाठी चालतं फिरतं जनहित केंद्र - संजय खाडे जनतेचे समस्या सोडवण्यासाठी चालतं फिरतं जनहित केंद्र - संजय खाडे Reviewed by सह्याद्री चौफेर on July 10, 2024 Rating: 5
Powered by Blogger.