दोन मुस्लिम प्राध्यापकांना पीएचडी मार्गदर्शनाचे मान्यता

सह्याद्री चौफेर | न्यूज 

चोपडा : डॉ मोहम्मद रगीब मोहम्मद उस्मान ज्यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथून आपले शिक्षण पूर्ण केले आणि जे श्रीमती शरद चंद्रिका सुरेश पाटील फार्मसी कॉलेज, चोपडा जिल्हा जळगाव महाराष्ट्र येथे औषधविज्ञान विभाग प्रमुख म्हणून गेल्या 14 वर्षांपासून कार्यरत आहेत, त्यांना जुलै 2022 मध्ये फार्मसीच्या विद्यार्थ्यांना पीएचडी करण्यासाठी मार्गदर्शन केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याच्या शासकीय विद्यापीठाकडून (कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव) कडून मान्यता मिळाली, त्याच बरोबर मुंबई विदयापीठातून शिक्षण पूर्ण केलेले आणि नंदुरबार येथील रुलर फाउंडेशन नंदुरबार येथील वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय अक्कलकुवा येथे प्राणिशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेले डॉ. मोहम्मद जुबेर शेख यांना प्राणीशास्त्र विषयात पीएचडी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शासकीय विद्यापीठाची मान्यता प्राप्त झाली, हे दोन्ही प्राध्यापक चोपडा जिल्हा जळगाव शहरातील रहिवासी आहेत आणि या पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले आहेत. आपल्या शहरातील हे स्थान मिळविणारे ते मुस्लिम समाजातील पहिले व्यक्ती आहेत, त्यामुळेच चोपडा शहरातील मुस्लिम समाजासाठी ही अभिमानाची बाब आहे, आम्ही त्यांचे अभिनंदन करतो आणि सर्वांनी अशाच प्रकारे जळगाव जिल्ह्याचे नाव रोशन करावे ही अपेक्षा करतो.

यवतमाळ जिल्ह्याच्या चमूने तीनही गटामध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला

सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट चॅम्पियनशिप भंडारा (लाखनी) येथे झालेली 21 वी सीनियर व 16 जुनिअर व 11 मिनी जुनियर टूर्नामेंट मध्ये यवतमाळ जिल्ह्याच्या चमूने तीनही गटामध्ये द्वितीय क्रमांक पटकाविलेला आहे त्यामुळे समस्त मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
चेन्नई येथे होणाऱ्या 27 व्या सब ज्युनियर नॅशनल टूर्नामेंट (मुले आणि मुली) मध्ये विदर्भ टीमकडून खेळणारी संपूर्ण चमुचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. या संपूर्ण चमु मध्ये जास्तीत जास्त उत्साही खेळाडू हे वणी पब्लिक स्कूलचे आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले मा. विक्रांत जी चचडा (सर) यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास कसा बाळगायचा हे त्यांनी आपल्या मनोगततून सांगितले. ॲड.प्रा.चंदुभाऊ राऊत सरांनी विद्यार्थ्यांच्या जीवनातील खेळाचे महत्व पटवून दिले. मा.पांडुरंग पांडीले (सर) खंडोबा वाघोबा देवस्थान चे अध्यक्ष यांनी सुध्दा सुंदर मार्गदर्शन केले. मा.गौतम जीवने (सर) यवतमाळ जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन चे सचिव यांनी टेनिस बॉल क्रिकेट संदर्भात पूर्ण माहिती दिली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मा. भरत लोहकरे सर, जि.पी टेनिस बॉल क्रि.असो.पायाभूत सदस्य मा. शाहिद शेख सर, जी.पी टेनिस बॉल क्रि.असो.पायाभूत सदस्य मा. प्रितेश लोणारे, सचिव जी.पी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन यांनी 14 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट ला चेन्नई येथे जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. सीमा कुमरे सामाजिक युवा कार्यकर्ता यांनी केले. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप..


चेतन पवार | सह्याद्री चौफेर 

दारव्हा : मागील सतत १२ वर्षांपासून आमदार संजय राठोड यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील विविध पत्रकार संघटनांच्या सहकार्याने होत असलेल्या १० वी व १२ विच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा शिव मंगल कार्यालयात थाटात संपन्न झाला या प्रसंगी ८० टक्क्याच्यार गुणप्राप्त गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा पालकांसह सत्कार करून आमदार संजय राठोड यांनी जवळपास आठशे विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतात परंतु विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पालकांचेही मोठे योगदान असते असे प्रतिपादन आमदार संजय भाऊ राठोड यांनी केले. गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या सत्कार सोहळ्यात बोलताना विद्यार्थी यशवंत, किर्तीवंत होताना आपल्या परिवाराचे, आपल्या शाळेचेच नाही, तर आपल्या गावाचाही लोकिक वाढवितात असे आमदार संजय भाऊ राठोड म्हणाल्या.
आमदार संजय राठोड यांच्या हस्ते संपन्न झालेल्या या सत्कार सोहळ्याच्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित मा.राजुदास जाधव,जिल्हा परिषद अध्यक्ष साै.कालींदा ताई पवार,जिल्हा परिषद सदस्य माजी विनोद खाेडे,श्रीधर काका मोहोड,पंचायत समिती माजी सभापती सुनीता ताई राऊत,नामदेव जाधव मनोज सिंगी, सुशांत इंगोले प्रविन भगत,हेमंत आडे यांच्यासह मान्यवर मंडळींची मंचावर उपस्थिति होती सूत्र संचलन किशोर राठोड यांनी केले. विद्यार्थी-विद्यार्थिनीभविष्यातील शैक्षणिक वाटचाली करीता मार्गदर्शन केले.सरस्वती पूजन व दिप प्रज्वलनाने सुरवात झालेल्या या सत्कार सोहळ्याच्या सुरवातीस १० वित तालुक्यातून प्रथम आलेल्या टॉपर त्याच बरोबर तालुक्यातून प्रथम आलेल्या टॉपर १२ वी सायंस सुजल राजेश आडे यांनी ९१ टक्के घेऊन पास झाले.कॉमर्स व आर्ट या विभागात तालुक्यातून टॉपर आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना फेटे बांधून बँडवाज्याने वाजत गाजत सत्कार समारंभस्थळी पाचारण करण्यात आले यावेळी उपस्थित विद्यार्थी व पालकांनी टाळ्या वाजवून या टॉपर विद्यार्थ्यांचे स्वागत केले. या टॉपर विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून प्रशस्तीपत्र, स्मार्टवॉच, आफीसफाईल, स्कूलबॅग, टिफिन बॉक्स, नोटबुक, पेन,पेन्सिल व शालेय साहित्य देऊन पालकांसह आमदार संजय राठोड यांच्या हस्ते मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत विशेष सत्कार करण्यात आला तर १० होतकरू गरजवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये असे एकूण एक लाख रुपये धांदेशाने आमदार संजय राठोड यांच्या तर्फे वितरित करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता तालुक्यातील विविध शिवसेना, युवासेना, विद्यार्थी सेना व महिला आघाडीने पुढाकार घेतला होता.
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधानाचा आनंद मला पाहायचा आहे - आमदार संजय राठोड

१० वी व १२ वी विद्याथ्र्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्वाची पायरी असल्याने गुणवंत विद्याथ्यांचे केवळ कौतुक करूनच थांबणार नाही तर पुढील शिक्षणा करीत योग्य मार्गदर्शन त्याच बरोबर सुशिक्षित बेरोजगारा करीता रोजगार निर्मिती करीता माझे प्रामाणिक प्रयत्न सुरु आहे मतदार संघाच्या सर्वागीण विकासा सोबतच प्रत्येकाच्या हाताला काम हे माझे स्वप्न असून घराघरात समृद्धी नांदून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधानाचा आनंद मला पाहायचा असल्याची ग्वाही आमदार संजय राठोड यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना या सत्कार सोहळ्याप्रसंगी दिली.

कवियत्री रजनी पोयाम यांची अविरोध निवड

चंदू राऊत | सह्याद्री चौफेर 

वणी : नाट्य, नृत्य, संगीत, साहित्य, चित्रकला, रांगोळी अशा विविध कलेच्या कलावंतांना व्यासपीठ देऊन त्यांची कला संपूर्ण देशात वाढविण्यासाठी संस्कार भारती समिती प्रयत्न करत असते. त्याकरिता वणी येथील संस्कार भारती समितीच्या स्थानिक शाखेच्या नुकत्याच झालेल्या सभेत संयोजक पदी रजनी पोयाम व सहसंयोजक म्हणून नारायण मांडवकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

जैताई मंदिरात संपन्न झालेल्या या सभेचे संचालन वणी समितीचे मुख्य संघटक सागर मुने ह्यांनी केले.
सभेत संयोजक व सहसंयोजक यांच्या सोबतच २२ - २३ करिता खालील पदाधिकारी अविरोध निवडण्यात आले.
कोषाध्यक्ष - तेजश्री कापसे, मुख्य संघटक : सागर मुने, सल्लागार - माधव सरपटवार, अशोक सोनटक्के, सदस्य - प्रवीण सातपुते,रविंद्र चव्हाण,संदीप सातपुते,
कविता चटकी, संध्या अवताडे, वैशाली बलकी, वनिता काकडे,रजनी हिकरे,संगीता खाडे,जयाताई हिकरे,स्वाती खरवडे आणि वीणा खोब्रागडे यांची नवीन कार्यकारिणी मध्ये निवड झाली आहे.

नूतन कार्यकारिणीच्या वतीने संयोजक रजनी पोयामने उपस्थितांचे आभार मानले व स्वातंत्र्याच्या अम्रुत महोत्सवी
वर्षात सर्वांनी अधिक सक्रीय राहण्याचे आवाहन केले.

गवारा येथे वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा

सह्याद्री चौफेर | न्यूज 

झरी : ओबीसी क्रांतीदलाचे सक्रीय नेते, माळी समाज भूषण, फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेचे पाईक, ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढा देणारे, विदर्भाचे दमदार व्यक्तीमत्व अखिल भारतीय माळी महासंघाचे तड़फदार नेतृत्व, अॅड.राजेंद्रजी महाडोळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्य गवारा येथे "झाडे लावा झाडे जगवा" ही मोहीम राबविण्यात आले. या वेळी उपस्थित गवारा गावाचे उपसरपंच मा श्री प्रवीणजी गुरनुले, सामाजिक कार्यकर्ता संदीपभाऊ भोयर, अखिल भारतीय माळी महासंघाचे अध्यक्ष दिनेश भाऊ गुरनुले, हणमलू फसलवार, गणेश महाडोळे, रामभाऊ मडावी, मनोहर आत्राम, विठ्ठल वसाके, संजय आत्राम गवारा सामाजिक कार्यकर्ता व गावातील नागरिक सर्वांनी वाढदिवस साजरा केला. व त्यांना वृक्षारोपण करून शुभेच्छा देण्यात आल्या.