यवतमाळ जिल्ह्याच्या चमूने तीनही गटामध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला

सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट चॅम्पियनशिप भंडारा (लाखनी) येथे झालेली 21 वी सीनियर व 16 जुनिअर व 11 मिनी जुनियर टूर्नामेंट मध्ये यवतमाळ जिल्ह्याच्या चमूने तीनही गटामध्ये द्वितीय क्रमांक पटकाविलेला आहे त्यामुळे समस्त मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
चेन्नई येथे होणाऱ्या 27 व्या सब ज्युनियर नॅशनल टूर्नामेंट (मुले आणि मुली) मध्ये विदर्भ टीमकडून खेळणारी संपूर्ण चमुचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. या संपूर्ण चमु मध्ये जास्तीत जास्त उत्साही खेळाडू हे वणी पब्लिक स्कूलचे आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले मा. विक्रांत जी चचडा (सर) यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास कसा बाळगायचा हे त्यांनी आपल्या मनोगततून सांगितले. ॲड.प्रा.चंदुभाऊ राऊत सरांनी विद्यार्थ्यांच्या जीवनातील खेळाचे महत्व पटवून दिले. मा.पांडुरंग पांडीले (सर) खंडोबा वाघोबा देवस्थान चे अध्यक्ष यांनी सुध्दा सुंदर मार्गदर्शन केले. मा.गौतम जीवने (सर) यवतमाळ जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन चे सचिव यांनी टेनिस बॉल क्रिकेट संदर्भात पूर्ण माहिती दिली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मा. भरत लोहकरे सर, जि.पी टेनिस बॉल क्रि.असो.पायाभूत सदस्य मा. शाहिद शेख सर, जी.पी टेनिस बॉल क्रि.असो.पायाभूत सदस्य मा. प्रितेश लोणारे, सचिव जी.पी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन यांनी 14 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट ला चेन्नई येथे जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. सीमा कुमरे सामाजिक युवा कार्यकर्ता यांनी केले. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.