चेतन पवार | सह्याद्री चौफेर
दारव्हा : मागील सतत १२ वर्षांपासून आमदार संजय राठोड यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील विविध पत्रकार संघटनांच्या सहकार्याने होत असलेल्या १० वी व १२ विच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा शिव मंगल कार्यालयात थाटात संपन्न झाला या प्रसंगी ८० टक्क्याच्यार गुणप्राप्त गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा पालकांसह सत्कार करून आमदार संजय राठोड यांनी जवळपास आठशे विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतात परंतु विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पालकांचेही मोठे योगदान असते असे प्रतिपादन आमदार संजय भाऊ राठोड यांनी केले. गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या सत्कार सोहळ्यात बोलताना विद्यार्थी यशवंत, किर्तीवंत होताना आपल्या परिवाराचे, आपल्या शाळेचेच नाही, तर आपल्या गावाचाही लोकिक वाढवितात असे आमदार संजय भाऊ राठोड म्हणाल्या.
आमदार संजय राठोड यांच्या हस्ते संपन्न झालेल्या या सत्कार सोहळ्याच्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित मा.राजुदास जाधव,जिल्हा परिषद अध्यक्ष साै.कालींदा ताई पवार,जिल्हा परिषद सदस्य माजी विनोद खाेडे,श्रीधर काका मोहोड,पंचायत समिती माजी सभापती सुनीता ताई राऊत,नामदेव जाधव मनोज सिंगी, सुशांत इंगोले प्रविन भगत,हेमंत आडे यांच्यासह मान्यवर मंडळींची मंचावर उपस्थिति होती सूत्र संचलन किशोर राठोड यांनी केले. विद्यार्थी-विद्यार्थिनीभविष्यातील शैक्षणिक वाटचाली करीता मार्गदर्शन केले.सरस्वती पूजन व दिप प्रज्वलनाने सुरवात झालेल्या या सत्कार सोहळ्याच्या सुरवातीस १० वित तालुक्यातून प्रथम आलेल्या टॉपर त्याच बरोबर तालुक्यातून प्रथम आलेल्या टॉपर १२ वी सायंस सुजल राजेश आडे यांनी ९१ टक्के घेऊन पास झाले.कॉमर्स व आर्ट या विभागात तालुक्यातून टॉपर आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना फेटे बांधून बँडवाज्याने वाजत गाजत सत्कार समारंभस्थळी पाचारण करण्यात आले यावेळी उपस्थित विद्यार्थी व पालकांनी टाळ्या वाजवून या टॉपर विद्यार्थ्यांचे स्वागत केले. या टॉपर विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून प्रशस्तीपत्र, स्मार्टवॉच, आफीसफाईल, स्कूलबॅग, टिफिन बॉक्स, नोटबुक, पेन,पेन्सिल व शालेय साहित्य देऊन पालकांसह आमदार संजय राठोड यांच्या हस्ते मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत विशेष सत्कार करण्यात आला तर १० होतकरू गरजवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये असे एकूण एक लाख रुपये धांदेशाने आमदार संजय राठोड यांच्या तर्फे वितरित करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता तालुक्यातील विविध शिवसेना, युवासेना, विद्यार्थी सेना व महिला आघाडीने पुढाकार घेतला होता.
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधानाचा आनंद मला पाहायचा आहे - आमदार संजय राठोड
१० वी व १२ वी विद्याथ्र्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्वाची पायरी असल्याने गुणवंत विद्याथ्यांचे केवळ कौतुक करूनच थांबणार नाही तर पुढील शिक्षणा करीत योग्य मार्गदर्शन त्याच बरोबर सुशिक्षित बेरोजगारा करीता रोजगार निर्मिती करीता माझे प्रामाणिक प्रयत्न सुरु आहे मतदार संघाच्या सर्वागीण विकासा सोबतच प्रत्येकाच्या हाताला काम हे माझे स्वप्न असून घराघरात समृद्धी नांदून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधानाचा आनंद मला पाहायचा असल्याची ग्वाही आमदार संजय राठोड यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना या सत्कार सोहळ्याप्रसंगी दिली.