सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : सणासुदीच्या काळात कपड्यांच्या खरेदीला विशेष महत्त्व असते. याच पार्श्वभूमीवर वणी शहरात ‘जय महाराष्ट्र खादी कॉटन महासेल’चे आयोजन करण्यात आले असून, ग्राहकांसाठी खादी कॉटनच्या विविध प्रकारच्या कपड्यांची मोठी रेंज उपलब्ध करून देण्यात आली आहे.
खादी म्हटले की पारंपरिक पोशाख अशी ओळख असली, तरी बदलत्या फॅशननुसार खादीमध्येही विविध प्रकार उपलब्ध झाले आहेत. याचाच अनुभव या महासेलमध्ये ग्राहकांना घेता येणार आहे. पुरुष, महिला तसेच तरुणांसाठी वेगवेगळ्या पसंतीनुसार कपड्यांचे पर्याय येथे ठेवण्यात आले आहेत.
हाफ शर्ट, फुल शर्ट, व्हाईट शर्ट, मोदी कुर्ता, पठाणी, पायजामा, जॅकेट, बंडी, नेहरू कुर्ती, बंगाली खादी, खादी पॅन्ट, जुट व पेपर खादी शर्ट, टॉवेल आणि रुमाल यासह विविध वस्त्रे ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. महिलांसाठीही खादी कुर्तींची विशेष रेंज ठेवण्यात आली आहे.
महासेलचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे काही वस्तूंवर देण्यात आलेल्या आकर्षक कॉम्बो ऑफर्स. लेडीज खादी कुर्ती ₹1000 मध्ये ४ नग तसेच खादी फुल शर्ट ₹1000 मध्ये ४ नग अशी ऑफर ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे.
गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सव आणि पुढील सण-समारंभांची लगबग सुरू होत असताना पारंपरिक पोशाखांची मागणी वाढते. त्यामुळे सणासाठी नवीन कपड्यांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी हा महासेल एक पर्याय ठरू शकतो.
वणी शहरात जैताई मंदिर, यवतमाळ रोड येथे हा महासेल सुरू असून, ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विविध प्रकारच्या खादी कॉटन वस्त्रांची खरेदी करता येणार आहे.


