टॉप बातम्या

आशिष रिंगोले यांची वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्रियपणे कार्य करणारे आशिष रिंगोले यांची वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र प्रदेशच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष डॉ. दिलीप चौधरी यांनी नियुक्तीपत्र देऊन ही जबाबदारी सोपविली.

आशिष रिंगोले यांनी यापूर्वी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून विद्यार्थी व युवकांच्या विविध प्रश्नांसाठी काम केले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या, स्पर्धा परीक्षा, रोजगार व इतर विद्यार्थीहिताच्या प्रश्नांवर त्यांनी विविध आंदोलने व उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. तसेच स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्हास्तरावर विद्यार्थी प्रश्नांसाठी केलेल्या कामाची दखल घेत त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

नवीन जबाबदारीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व करिअरविषयक प्रश्नांना प्राधान्य देत विद्यार्थी संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार आशिष रिंगोले यांनी व्यक्त केला.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();