चंदू राऊत | सह्याद्री चौफेर
वणी : नाट्य, नृत्य, संगीत, साहित्य, चित्रकला, रांगोळी अशा विविध कलेच्या कलावंतांना व्यासपीठ देऊन त्यांची कला संपूर्ण देशात वाढविण्यासाठी संस्कार भारती समिती प्रयत्न करत असते. त्याकरिता वणी येथील संस्कार भारती समितीच्या स्थानिक शाखेच्या नुकत्याच झालेल्या सभेत संयोजक पदी रजनी पोयाम व सहसंयोजक म्हणून नारायण मांडवकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
जैताई मंदिरात संपन्न झालेल्या या सभेचे संचालन वणी समितीचे मुख्य संघटक सागर मुने ह्यांनी केले.
सभेत संयोजक व सहसंयोजक यांच्या सोबतच २२ - २३ करिता खालील पदाधिकारी अविरोध निवडण्यात आले.
कोषाध्यक्ष - तेजश्री कापसे, मुख्य संघटक : सागर मुने, सल्लागार - माधव सरपटवार, अशोक सोनटक्के, सदस्य - प्रवीण सातपुते,रविंद्र चव्हाण,संदीप सातपुते,
कविता चटकी, संध्या अवताडे, वैशाली बलकी, वनिता काकडे,रजनी हिकरे,संगीता खाडे,जयाताई हिकरे,स्वाती खरवडे आणि वीणा खोब्रागडे यांची नवीन कार्यकारिणी मध्ये निवड झाली आहे.
नूतन कार्यकारिणीच्या वतीने संयोजक रजनी पोयामने उपस्थितांचे आभार मानले व स्वातंत्र्याच्या अम्रुत महोत्सवी
वर्षात सर्वांनी अधिक सक्रीय राहण्याचे आवाहन केले.