जेष्ठ नागरिक संघाचे अमृत महोत्सव म्हणजे जेष्ठांच्या सेवेचा सन्मान - आ. जोरगेवार

सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने चांगल्या समाज निर्मितीच्या दिशेने कौतुकास्पद काम केल्या जात आहे. ७५ वर्ष पूर्ण झालेल्या जेष्ठ नारिकांसाठी त्यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेले हे अमृत महोत्सव म्हणजे खऱ्या अर्थाने जेष्ठांनी आजवर विविध क्षेत्रात दिलेल्या सेवाचा सन्मान असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी आज केले.

जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने रामनगर येथील जेष्ठ नागरिक संघाच्या सांस्कृतिक भवन येथे ७५ वर्ष पूर्ण झालेल्या जेष्ठांचा अमृत महोत्सव व सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी राष्ट्रपती पोलिस शौर्य पदकाने सन्मानित पोलिस अधिकारी तथा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष महादेव पिंपळकर यांची अध्यक्षस्थानी तर समतावादी हिंदु धर्म परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश वाकुडकर, ओबीसी नेते तथा सामाजिक कार्यकर्ते अशोक जिवतोडे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.

कोणत्याही क्षेत्रात जेष्ठांच्या अनूभवी मार्गदर्शनाशिवाय यशस्वी वाटचाल करणे शक्य नाही. जेष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमात मला वारंवार येण्याचा योग येतो हे माझे भाग्य आहे. जेष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमांमध्ये आल्यावर आनंदासह काम करण्याची नवी ऊर्जा मिळते. जेष्ठांचे विचार आणि सूचना या अमुल्य असून त्या विचारात घेतल्या गेल्या पाहिजे, समाजानेही त्यांना योग्य वागणून दिली पाहिजे त्यांच्या सूचनांची दखल घेतली पाहिजे असे यावेळी बोलतांना ते म्हणाले, विकास कामांसह सामाजिक सलोखा व ऐक्य टिकवत समाजाची ओळख अबाधित ठेवण्याचे काम लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून झाले पाहिजे त्या दिशेने माझे प्रयत्न सुरु आहे. जेष्ठ नागरिक सुध्दा या समाजाचा एक महत्वाचा घटक आहे. जेष्ठ नागरिक संघाच्या विकासासाठी आपण २५ लक्ष रुपयांचा निधी दिला आहे. पूढेही शक्य ती मदत करण्याची माझी तयारी असल्याचेही ते म्हणाले, आपआपल्या क्षेत्रात कामाच्या व्यस्ततेत जगत असतांना आतील कलागुण लुप्त होतात. मात्र निवृत्ती नंतर दळलेल्या कलागुणांना पून्हा पुनर्जीवित करण्याचे काम जेष्ठ नागरिक संघ करत आहे. जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित या अमृत महोत्सवात जेष्ठांकडून करण्यात येत असलेले विविध कलांचे सादरीकरण मंत्रमुग्घ करणारे असून हे अमृत महोत्सव खऱ्या अर्थाने जेष्ठांच्या कलागुणांचा सन्मान करणारे एक हक्काचे व्यासपीठ आहे. असे आयोजन नियमित करण्यात यावे या कार्यक्रमाला जेष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष केशवराव चौधरी, सचिव प्रा. माणिकराव अंधारे, सहसचिव देवराव सोनपितरे, कोषाध्यक्ष माणिकराव गहोकार, हिशोब तपासणिस विठ्ठल घुमडे यांच्यासह जेष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

प्रहार संघटना व पुणे महानगरपालिकेचा "एक हात मदतीचा" उपक्रम


सह्याद्री न्यूज : अतुल खोपटकर

पुणे : महानगरपालिका दिव्यांग कर्मचारी-अधिकारी व प्रहार दिव्यांग शासकीय-निमशासकीय कर्मचारी व अधिकारी संघटनेचे अध्यक्ष श्री. हरीष आल्हाट यांनी ३ डिसेंबर २०२१ रोजी जागतिक दिव्यांग (अपंग) दिनाचे औचीत्य साधून, आपली सामाजिक जाणीव ओळखून, सिंहगड रोड परिसरातील श्री साईबाबा शिर्डी अंध निवासी महिलाश्रम, विशेष मुलांच्या निवासी शाळेत भेट देऊन, तेथील परिस्थिती पाहून अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

पुणे महानगरपालिका व प्रहार दिव्यांग शासकिय-निमशासकीय कर्मचारी व अधिकारी संघटना यांच्या वतीने या सामाजिक लोकोपयोगी उपक्रमाचे आयोजन कोरोना नियम पाळून, सुरक्षित अंतर ठेऊन, नियोजनबद्ध करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे नियाजन श्री. तुळशीदास येनगुल यांनी केले. अध्यक्ष हरीष आल्हाट यांचे हस्ते धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

या वेळी दिव्यांग अधिनियम २०१६ विषयी माहिती अध्यक्ष श्री. हरीष आल्हाट यांनी योग्यप्रकारे समजावून सांगितली. या कायद्यातील कलम ३४ नुसार दिव्यांगासाठी ४ टक्के नोकरीत आरक्षण व कलम ९२ नुसार दंड कायदेशीर कार्यवाही करण्यात येत असल्याचे श्री. आल्हाट यांनी आवर्जून सांगितले. या कायद्याची जागृती होणे आवश्यक आहे, असे सर्व दिव्यांग सेवकांचे मत आहे.

यावेळी तुळशीदास येनगुल, पुष्कर मोरे, रोहिणी मडीकर, भाई ताम्हणे, अंध महिला आशा शेवकर, शालन शिंदे, गीता सावंत आश्रम संचालिका मनिषा लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

रासेयो च्या वतीने जागतिक एड्स निर्मूलन दिन साजरा


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

मारेगाव : कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून जागतिक एड्स निर्मूलन दिन साजरा करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ सुभाष इंगोले, वैद्यकीय अधिकारी ब्रम्हपुरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एड्स विषयी जागरूकता व आधुनिक उपचारपद्धती यावर संवाद साधला. तसेच मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ राजेश चवरे यांनी तरुण मुला मुलींना एड्स विषयी गैरसमज दूर करून वेळीच सावध राहिले पाहिजे असे सांगण्यात आले. त्याच बरोबर अध्यक्ष म्हणून डॉ अविनाश घरडे यांनी समाजामध्ये एड्स विषयी जन जागृती निर्माण पाहिजे असा संदेश देण्यात आला.
यावेळी नेहरू युवा केंद्र मारेगाव येथील कु स्वाती ठेंगणे, यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा बाळासाहेब देशमुख यांनी केले तर, आभार प्रदर्शन प्रा विजय भगत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ गजानन सोडनर, डॉ प्रवीण कुलकर्णी, डॉ माधुरी तानूरकर, डॉ विभा घोडखांदे, प्रा शैलेश कांबळे, प्रा शेंडे मॅडम यांनी अथक परिश्रम घेतले. 

आदिवासी एकता युवा परिषदच्या वतीने महिला हिंसाचार विरोधी कार्यक्रम


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

गडचिरोली : आदिवासी एकता युवा परिषदच्या वतीने बुधवार दि.१ डिसेंबरला गडचिराेली जिल्ह्यातील लांजेडा येथे महिला हिंसाचार विरोधी कार्यक्रम आयोजित करण्यात आला हाेता.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई ब्राम्हणवाडे यांनी विभूषित केले हाेते तर मार्गदर्शक म्हणुन अॅड. निलिमा जुमनाके,निता वडेट्टीवार, गोविंदराव ब्राम्हणवाडे विलासराव निंबोरकर, अरुण भोसले तुलाराम नैताम, कुसुम ताई अलाम उपस्थित हाेते.या शिवाय या कार्यक्रमाला मानका सुधाकर मेश्राम, पारबता दशरथ गेडाम, सुषमा गणेश मडावी,शकुंतला सोमनकार, मंगला नैताम, शेवंता टिंगुसले, अल्का नैताम, इंदिरा नैताम, कासु नैताम, वंदना नैताम, लिला नैताम, व दारुबंदीच्या इतर महिला सदस्या उपस्थित होत्या.

आयोजित चर्चा सत्राच्या अनुषंगाने महिला हिंसाचार प्रतिबंधक कायद्याची माहिती या वेळी देण्यात आली. तदवतचं महिलांच्या विविध विषयांवर प्रदीर्घ चर्चा करण्यांत आली.

संशयावरुन बेदम मारहाण प्रकरणात "त्या "वनकर्मचा-यांवर अट्रॉसिटी चा गुन्हा दाखल


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : ताडाेबा बफर झाेनला लागून असलेल्या चिचाेली गावातील काही व्यक्तींना वनविभागाच्या कर्मचारी वर्गांनी संशयापाेटी बेदम मारहाण केल्याची घटना दि.२४ नाेव्हेंबरला घडली हाेती. दरम्यान या घटनेसंदर्भात दुर्गापूर पाेलिस स्टेशनला मारहाण झालेल्या व्यक्तींनी तक्रार दाखल केली हाेती. त्या संदर्भात काही कर्मचा-यांवर अट्रॉसिटी चा गुन्हा नुकताच दाखल झाला आहे. वनविभागाच्या अन्य काही कर्मचा-यांची देखिल चाैकशी सुरु झाली असल्याचे वृत्त आहे.

 सदरहु प्रकणात निर्दाेष व अन्याय झालेल्या व्यक्तींना याेग्य न्याय मिळावा व जे काेणी अधिकारी व वन कर्मचारी या घटनेत जबाबदार असतील त्यांना निलंबितच नाहीह तर सेवेतून बडतर्फे करावे तसेच त्यांचेवर अट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राजू झाेडे व अॅड.फरहत बेग यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे व पाेलिस अधिक्षक अरविंद साळवे यांचे कडे केली हाेती.
सदरहु मारहाण प्रकरणात आठ ते नव वन कर्मचा-यांचा समावेश असल्याचे बाेलल्या जाते.शिकारीच्या संशयापाेटी वन कर्मचा-यांनी चिचाेली गावातील काही व्यक्तींना अमानुषपणे मारहाण केली हाेती. सध्या या प्रकरणाची चाैकशी एसडीपीआे नंदनवार यांचे कडे साेपविण्यात आली असल्याचे समजते.