टॉप बातम्या

प्रहार संघटना व पुणे महानगरपालिकेचा "एक हात मदतीचा" उपक्रम


सह्याद्री न्यूज : अतुल खोपटकर

पुणे : महानगरपालिका दिव्यांग कर्मचारी-अधिकारी व प्रहार दिव्यांग शासकीय-निमशासकीय कर्मचारी व अधिकारी संघटनेचे अध्यक्ष श्री. हरीष आल्हाट यांनी ३ डिसेंबर २०२१ रोजी जागतिक दिव्यांग (अपंग) दिनाचे औचीत्य साधून, आपली सामाजिक जाणीव ओळखून, सिंहगड रोड परिसरातील श्री साईबाबा शिर्डी अंध निवासी महिलाश्रम, विशेष मुलांच्या निवासी शाळेत भेट देऊन, तेथील परिस्थिती पाहून अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

पुणे महानगरपालिका व प्रहार दिव्यांग शासकिय-निमशासकीय कर्मचारी व अधिकारी संघटना यांच्या वतीने या सामाजिक लोकोपयोगी उपक्रमाचे आयोजन कोरोना नियम पाळून, सुरक्षित अंतर ठेऊन, नियोजनबद्ध करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे नियाजन श्री. तुळशीदास येनगुल यांनी केले. अध्यक्ष हरीष आल्हाट यांचे हस्ते धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

या वेळी दिव्यांग अधिनियम २०१६ विषयी माहिती अध्यक्ष श्री. हरीष आल्हाट यांनी योग्यप्रकारे समजावून सांगितली. या कायद्यातील कलम ३४ नुसार दिव्यांगासाठी ४ टक्के नोकरीत आरक्षण व कलम ९२ नुसार दंड कायदेशीर कार्यवाही करण्यात येत असल्याचे श्री. आल्हाट यांनी आवर्जून सांगितले. या कायद्याची जागृती होणे आवश्यक आहे, असे सर्व दिव्यांग सेवकांचे मत आहे.

यावेळी तुळशीदास येनगुल, पुष्कर मोरे, रोहिणी मडीकर, भाई ताम्हणे, अंध महिला आशा शेवकर, शालन शिंदे, गीता सावंत आश्रम संचालिका मनिषा लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
Previous Post Next Post