सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
मारेगाव : कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून जागतिक एड्स निर्मूलन दिन साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ सुभाष इंगोले, वैद्यकीय अधिकारी ब्रम्हपुरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एड्स विषयी जागरूकता व आधुनिक उपचारपद्धती यावर संवाद साधला. तसेच मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ राजेश चवरे यांनी तरुण मुला मुलींना एड्स विषयी गैरसमज दूर करून वेळीच सावध राहिले पाहिजे असे सांगण्यात आले. त्याच बरोबर अध्यक्ष म्हणून डॉ अविनाश घरडे यांनी समाजामध्ये एड्स विषयी जन जागृती निर्माण पाहिजे असा संदेश देण्यात आला.
यावेळी नेहरू युवा केंद्र मारेगाव येथील कु स्वाती ठेंगणे, यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा बाळासाहेब देशमुख यांनी केले तर, आभार प्रदर्शन प्रा विजय भगत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ गजानन सोडनर, डॉ प्रवीण कुलकर्णी, डॉ माधुरी तानूरकर, डॉ विभा घोडखांदे, प्रा शैलेश कांबळे, प्रा शेंडे मॅडम यांनी अथक परिश्रम घेतले.
रासेयो च्या वतीने जागतिक एड्स निर्मूलन दिन साजरा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 03, 2021
Rating:
