सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
गडचिरोली : आदिवासी एकता युवा परिषदच्या वतीने बुधवार दि.१ डिसेंबरला गडचिराेली जिल्ह्यातील लांजेडा येथे महिला हिंसाचार विरोधी कार्यक्रम आयोजित करण्यात आला हाेता.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई ब्राम्हणवाडे यांनी विभूषित केले हाेते तर मार्गदर्शक म्हणुन अॅड. निलिमा जुमनाके,निता वडेट्टीवार, गोविंदराव ब्राम्हणवाडे विलासराव निंबोरकर, अरुण भोसले तुलाराम नैताम, कुसुम ताई अलाम उपस्थित हाेते.या शिवाय या कार्यक्रमाला मानका सुधाकर मेश्राम, पारबता दशरथ गेडाम, सुषमा गणेश मडावी,शकुंतला सोमनकार, मंगला नैताम, शेवंता टिंगुसले, अल्का नैताम, इंदिरा नैताम, कासु नैताम, वंदना नैताम, लिला नैताम, व दारुबंदीच्या इतर महिला सदस्या उपस्थित होत्या.
आयोजित चर्चा सत्राच्या अनुषंगाने महिला हिंसाचार प्रतिबंधक कायद्याची माहिती या वेळी देण्यात आली. तदवतचं महिलांच्या विविध विषयांवर प्रदीर्घ चर्चा करण्यांत आली.
आदिवासी एकता युवा परिषदच्या वतीने महिला हिंसाचार विरोधी कार्यक्रम
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 03, 2021
Rating:
