आज वणी येथे संविधान दिनानिमित्त जाहीर व्याख्यान

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी एस.बि.लॉन वणी येथे सायंकाळी ६ वाजता जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा.डॉ. प्रकाश सिरसाट जेष्ठ आंबेडकरी विचारवंत, छत्रपती संभाजी नगर,तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. प्रमोद हेरोडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, छत्रपती संभाजी नगर, प्रा.तक्षशिल सुटे, आनंद निकेतन विद्यालयात वरोरा हे भारतीय संविधान, निर्मितीचा इतिहास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भुमिका व भारतीय संविधान, अनु,जाती जमाती व ओ.बि.सी.समाजापुढील आव्हाने या विषयावर मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत. तरी या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे, आवाहन आयोजक डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने करण्यात आले आहे.
आज वणी येथे संविधान दिनानिमित्त जाहीर व्याख्यान आज वणी येथे संविधान दिनानिमित्त जाहीर व्याख्यान Reviewed by सह्याद्री चौफेर on November 30, 2024 Rating: 5
Powered by Blogger.