सौ.मनिषा तिरणकर यांना राज्यस्तरीय संविधान गौरव पुरस्कार जाहीर


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

यवतमाळ : जिल्ह्यासह महाष्ट्रभर सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या रुग्णहक्क संरक्षण समिती संस्था महाराष्ट्रच्या वतीने ३० नोव्हेंबर २०२४ ला राज्यस्तरीय संविधान गौरव पुरस्कार आयोजित करण्यात आला आहे.यात सौ.मनिषा तिरणकर, राज्याध्यक्ष अखिल भारतीय महिला संवैधानिक हक्क परिषद यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रभर रुग्णांच्या न्याय हक्कासाठी व त्यांच्या हितासाठी कार्य करणारी सामाजिक संस्था, रुग्णहक्क संरक्षण समिती महाराष्ट्र जिल्हा परभणीच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, आरोग्य, सांस्कृतिक, पत्रकारिता, बचतगट, क्रीडा, इत्यादी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या २१ समाज सेवकांचा संविधान सन्मान गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यात सौ.तिराणकर ह्यांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय क्षेत्रात काम केल्याबद्दल हा पुरस्कार सन्माननीय मान्यवर यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात येत आहे.

हा सन्मान गौरव सोहळा शनिवार दि.३० नोव्हेंबर २०२४ ला पत्रकार भवन एसपी आफिस समोर बसमत रोड परभणी इथे पार पडणार आहे.
सौ.मनिषा तिरणकर यांना राज्यस्तरीय संविधान गौरव पुरस्कार जाहीर सौ.मनिषा तिरणकर यांना राज्यस्तरीय संविधान गौरव पुरस्कार जाहीर Reviewed by सह्याद्री चौफेर on November 30, 2024 Rating: 5
Powered by Blogger.