अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संविधान प्रबोधन परीक्षा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्य "जागर संविधानाचा अभियान" अंतर्गत बौध्द स्मारक समिती, चिंचमंडळ द्वारा आयोजित "संविधान प्रबोधन परीक्षा" 26 नोव्हेंबर ला घेण्यात आली.

संविधानाप्रती जनजागृती करिता आपले हक्क व मूलभूत अधिकाराविषयी ओळख होऊन त्या विषयी विद्यार्थ्यांचा अभ्यास व्हावा त्याकरिता जागर संविधानाचा अभियान अंतर्गत समिती द्वारे आदर्श हायस्कुल मार्डी व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय चिंचमंडळ येथील विद्यार्थ्यांना संविधानातील प्रमुख कलमे व विविध माहिती असलेले पुस्तकांचे वाटप करण्यात आले होते. त्याच पुस्तकावर आधारे ही संविधान प्रबोधन परीक्षा घेण्यात आली.
    

संविधान दिनी सर्वप्रथम बौ. स्मा. समिती चे अध्यक्ष ज्ञानेश्वर देठे यांच्या अध्यक्षतेत तथा सचिव राजेश कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय संविधान व भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून या संविधान प्रबोधन परीक्षेला सुरुवात करण्यात आली. यामध्ये सहभागी शाळा आदर्श हायस्कुल मार्डी येथील वर्ग 8 वी ते 10 वी चे 110 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तसेच कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय चिंचमंडळ येथील 80 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामधून निवड झालेल्या प्रत्येकी शाळेतील विद्यार्थ्यांना 4 पारोतोषिक, स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देण्यात येणार आहे.

या प्रबोधन परीक्षा करिता मुख्याध्यापक श्री. ढुमणे सर व मुख्याध्यापक श्री. रमेश खेकारे सर तसेच सचिव राजेश कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने, विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभागाने पार पडली.

या परीक्षेला पर्यवेक्षक म्हणुन गंभीर कवाडे, विजय कवाडे, सुरेश कवाडे, ईश्वर दुपारे, शैलेश कवाडे यांनी कार्यभार पाहिला. ही परीक्षा यशस्वीरीत्या पार पाडण्याकरिता दोनही शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संविधान प्रबोधन परीक्षा  अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संविधान प्रबोधन परीक्षा Reviewed by सह्याद्री चौफेर on November 30, 2024 Rating: 5
Powered by Blogger.