चोपणमध्ये उगवला जिवंत नाला: उन्हाळ्यात सुद्धा वाहत असते या रस्त्यावरून पाणी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 
                    
मारेगाव : चोपणमध्ये मागील अनेक दिवसांपासून जिवंत नाला अवतरला असून या जिवंत नाल्यामुळे चोपण गावातील मुख्य रस्त्यावर उन्हाळ्यातसुद्धा पाणी वाहत असते. त्यामुळे गावामध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.या वाहणाऱ्या पाण्याकडे कोणाचेच लक्ष नसल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
       
मारेगाव तालुक्यातील राजकीय व आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले चोपण हे गाव.परंतु मागील अनेक दिवसांपासून या गावाला गावातील मुख्य रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे अवकळा आलेली आहे. या मुख्य रस्त्याने वर्षभर सांडपाणी वाहत असते. त्यामुळे गावातून एखादा नाला तर वाहत नाही ना असा भास सुद्धा होत असतो.

चोपणचे भूषण असलेले मंदिर. पण या रस्त्यामुळे सगळे लोप पावत आहे. बाहेर गावातील नागरिक या वाहणाऱ्या पाण्यामुळे छी... थू... करतांना दिसत आहे. या रस्त्यावरील वाहणाऱ्या पाण्यात अनेकजण आपली वाहने घेऊन पडलेली आहे. तरीही ग्रामपंचायतला जाग येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
या घाण पाण्यामुळे गावामध्ये रोगराई पसरत आहे. अनेक वेगवेगळ्या बिमाऱ्या वाढत आहे. त्यामुळे याकडे कोण लक्ष देईल असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे.
चोपणमध्ये उगवला जिवंत नाला: उन्हाळ्यात सुद्धा वाहत असते या रस्त्यावरून पाणी चोपणमध्ये उगवला जिवंत नाला: उन्हाळ्यात सुद्धा वाहत असते या रस्त्यावरून पाणी Reviewed by सह्याद्री चौफेर on November 29, 2024 Rating: 5
Powered by Blogger.