डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय पूर्ववत सुरु करण्याची मागणी


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : नगरपालीका हद्दीत मध्यवस्तीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय जे बंद अवस्थेत व दुर्लक्षीत आहे ते पूर्ववत सुरु करण्यात यावे व त्यासमोरील गेट समोरील अतिक्रमण काढून त्याला लोकोपयोगी करण्यात यावे अशा आशयचे निवेदन देण्यात आले.

नगर पालीका हद्दतील मध्यवस्तीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय जे मागील ३ दशकापासून बंद अवस्थेत आहे व दुर्लक्षीत आहे. त्या नगरपालीकांच्या दुर्लक्षीत धोरणामुळे ही इमारत हेतू पुरस्पर आपला विभाग दुर्लक्ष करीत आहे. म्हणून आपणास या निवेदनाद्वारे कळविण्यात येतेय की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय पूर्ववत सुरु करण्यात यावे व सोबत त्या परिसरात मुख्यद्वारा जवळ अतिक्रमण काढण्यात यावे. सोबत रंगरंगोटी व साफसफाई करण्यात यावी व कायमस्वरुपी त्या वाचनालयाला पूर्ववत लोकांसाठी खुले करण्यात यावे. येत्या आठ दिवसात या वाचनालयाची दुरुस्ती, रंगरंगोटी व कायमस्वरुपी सुरु करण्यात यावे अन्यथा ६ डिसेंबर २०२४ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (पुतळ्याजवळ) आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे नगर पालीका प्रशासनानी निवेदनातून कळविण्यात आले आहे. 

या प्रकरणाकडे पालीका प्रशासनांनी दुर्लक्षीत केले व कुठलीही कायदा सुव्यवस्थेत अडथळा निर्माण झाला याकरीता पालीका प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.निवेदन देते वेळी बबलुभाऊ मेश्राम, प्रविण खान‌झोडे, धीरज पाते, रवींद्र कांबळे, किशोर मुन, पी के टोंगे, महेश टिपले, गजानन आत्राम,  शेख मोहंमद अल कमल, अजय खोब्रागडे, सचिन टिपले, सुरज उपरे, दादाजी देठे सर्व सहकारी उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय पूर्ववत सुरु करण्याची मागणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय पूर्ववत सुरु करण्याची मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on November 26, 2024 Rating: 5
Powered by Blogger.