सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी :- आज तारीख २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन असल्याने वणी विधानसभेचे नवनिर्वाचित लोकप्रिय आमदार संजय देरकर यांनी चैत्यभूमी मुंबई येथे जावून भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. संविधानाच्या दिनाचे महत्त्व समजून वणीतील आमदारकीच्या इतिहासामधील चैत्यभूमीवर जाणारे संजय देरकर हे पहीले आमदार ठरले अशी चर्चा मतदार संघातील संविधानप्रेमी जनतेत सुरू झाली आहे.
मागील २ दिवसापासून वणीचे लोकप्रिय आमदार संजय देरकर हे मुंबई येथे जावून आहे. त्यांनी मुबई येथे जाताच हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट देवून त्यांना अभिवादन केले. त्याच बरोबर मातोश्रीवर जावून उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
मुंबई येथील २६/११ च्या आतंकवादी हल्यातील शहीद झालेल्या स्मृती स्थळाला देखील आ. देरकर यांनी भेट देवून सर्व शहिदांना मानवंदना अर्पण केली आहे. भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून चैत्यभूमीवर जावून भारतीय संविधानाला व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणारे आमदार संजय देरकर हे पहिले आमदार ठरले आहे.
तर स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन केल्याने वणी विधानसभेतील संविधानप्रेमी व शिवप्रेमी जनतेमध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी त्याचसोबत जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे, दीपक कोकस, डॉ. विवेक गोफणे, सुधीर थेरे, शरद ठाकरे, आदी उपस्थित होते.
संविधान दिना निमित्त आ. संजय देरकर यांचेकडून चैत्यभूमीवर जावून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 26, 2024
Rating: