लाडक्या बहिणींनी संविधान दिनी केले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी व सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन वणी च्या वतीने संविधान दिना साजरा करण्यात आला. 

आजच्या दिवशी भारतीय संविधानाचा जन्म झाला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान सभेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानाचा अंतिम मसुदा स्वीकारला होता. संविधान हे भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे आजच्या दिवशी संविधान दिन साजरा केला जातो. दिवशी भारतीय नागरिकांनी संविधानाच्या मूल्यांचे पालन करण्याचे वचन दिले पाहिजे.

संविधान दिनाच्या निमित्ताने सर्व नागरिकांना अभिवादन! आपण संविधानाच्या मूल्यांचे पालन करूया आणि भारतीय लोकशाहीला मजबूत करूया! असे विचार किरणताई देरकर संस्थापक अध्यक्षा सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन वणी व्यक्त केले.
 
यावेळी चंदाताई मुन माजी पंचायत समिती सदस्य, पुष्पाताई भोगेकर माजी पंचायत समिती सदस्य,वृषालीताई खानझोडे माजी उपासभापती वणी, मंदा सोनारखन, प्रगती घोटेकर' मिनाक्षी मोहीते, सुरेखाताई ढंगळे, मंजूताई इनामे, वेणुताई झोडे, लताताई फलफुलवार, माजी सरपंच शिरपूर सारिका थेरे, सिमा बालगुणे, महिला व पुरुष मंडळी उपस्थित होते.
लाडक्या बहिणींनी संविधान दिनी केले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन लाडक्या बहिणींनी संविधान दिनी केले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन Reviewed by सह्याद्री चौफेर on November 26, 2024 Rating: 5
Powered by Blogger.