अरविंद बोबडे यांचे निधन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : काँग्रेस समर्थक तथा भूतपूर्व कॅसिअर निलजई उपक्षेत्र अरविंद बोबडे यांचे आज रविवारी सकाळी नागपूर जात असताना वरोरा येथे हृदय विकाराचा झटका आल्याने वाटेतच निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 65 वर्षाचे होते. ते लालगुडा मधील भूमि पार्क फ्लॅट मध्ये राहत होते. लगेचच त्यांचे पार्थिव वणी येथे आणण्यात आले. एक दोन दिवसापासून त्यांना अस्वस्थता वाटत होते. त्यामुळे ते आज नागपूर ला जात असताना त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा (हमु.श्रीलंका), एक मुलगी (हमु.अस्ट्रेलिया) असा आप्त परिवार आहे. 


अरविंद बोबडे यांचे निधन अरविंद बोबडे यांचे निधन Reviewed by सह्याद्री चौफेर on May 25, 2025 Rating: 5
Powered by Blogger.