लाठी येथे दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : लाठी येथील तुकडोजी महाराज सभागृहात दहावी व बारावी परीक्षेत यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा दि.२५/५/२०२५ रोज शनिवार ला मोठ्या थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन गुरुदेव सेवा मंडळ लाठी येथील युवकांनी केले.
     

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास खोके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य ॲड राहुल खारकर,ग्रामपंचायत सदस्य रिना लाडे,पोलिस पाटील संजीवनी खिरटकर,ग्रामपंचायत अधिकारी मंगेश खोके, माजी तंटामुक्ती अध्यक्ष धर्मा डोहे,हरिदास वाघाडे,रमेश खिरटकर,सुरेश माहूरे,महादेव माहूरे यांची उपस्थिती होती.सत्कार सोहळ्याची सुरुवात तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलनाने झाली. स्वागतपर भाषणात आयोजकांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
    
या सोहळ्यात दहावी व बारावी परीक्षेत शालेय तसेच विभागीय पातळीवर विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.त्याचसोबत 15 ऑगस्ट 2025 रोजी राज्यपाला पुरस्काराने गावातील पोलिस पाटील संजीवनी खिरटकर यांचा सत्कार करण्यात आला होता त्यामुळे त्यांचा सुद्धा या कार्यक्रमा निमित्त गावातील गुरुदेव सेवा मंडळ लाठी यांनी सत्कार केला. त्याचसोबत गावातील विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह,पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये समीक्षा खारकर,गौरी डोहे, मानसी मांडवकर, लाभेश दोरखंडे, अक्षता खोके आदींचा समावेश होता.
 

पालकवर्गानेही कार्यक्रमाचे कौतुक करत आयोजकांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.प्रदीप माहूरे यांनी केले, तर आभारप्रदर्शन श्री.नंदू माहूरे यांनी केले.या सत्कार सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले असून, हा उपक्रम पुढील वर्षी आणखी मोठ्या प्रमाणात राबविण्याचा निर्धार प्रभाकर वाघाडे,आशिष माहूरे,संदीप गोवारदिपे, निलेश करडे,ईश्वर माहूरे,मंगेश मोते,यासह गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
लाठी येथे दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार लाठी येथे दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार Reviewed by सह्याद्री चौफेर on May 25, 2025 Rating: 5
Powered by Blogger.