Top News

तलावात बुडून इयत्ता आठवीत शिकणाऱ्या बालकाचा मृत्यू

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगांव : तलावात बुडून एका बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी नऊ वाजता घडली. चौदा वर्षाचा मुलगा, राकेश मोहन आत्राम रा.कुटकी (ता. हिंगणघाट, जि वर्धा) असं त्या तलावात बुडून मृत्यूमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. 

माहितीनुसार मारेगाव तालुक्यातील अर्जुनी येथील पाझर तलावात बुडून त्याचा मृत्यू झाला. तो कुटकी येथून शाळेच्या सुट्ट्या साजऱ्या करण्यासाठी मारेगाव तालुक्यातील अर्जुनी येथील आजोबांकडे (रामदास मडावी) आला होता. 

आज रविवारी बैलाला पाणी पाजण्यासाठी तो गेला होता, बैल पाणी पीत असतांना एका म्हैस ने बैलास धडक देत राकेशच्या हातातील कासरे सुटले व राकेश हा पाण्यात पडला. काठावरील खोल खड्यात इयत्ता आठव्या वर्गात शिकणाऱ्या बालकाचा दुर्देवी अंत झाला. या हृदयद्रावक घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. 
Previous Post Next Post