संजय खाडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम घेऊन साधेपणाने साजरा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शेतकरी व कामगार नेते संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत शुक्रवारी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी मंदिर येथील वसंत जिनिंगच्या सभागृहात हा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. यावेळी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 80 पेक्षा अधिक रक्तदात्यांनी सहभाग घेतला तर महिला उद्योजक्ता शिबिरात मोठ्या संख्येने बचत गट, स्वयंरोजगार करण्यास इच्छुक महिला सहभागी झाल्या होत्या. दरम्यान आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबीयांना मान्यवरांच्या हस्ते बी-बियाणे कीटचे वाटप करण्यात आले. अभिष्टचिंतन सोहळ्याचे अध्यक्ष विश्वास नांदेकर होते तर उद्घाटक विजय मुकेवार होते. एपीआय सीता वाघमारे, नरेंद्र ठाकरे इत्यादी मान्यवरांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. 

कार्यक्रमाची सुरुवात रक्तदान शिबिराने झाली. मान्यवरांच्या हस्ते या उपक्रमाचे रितसर उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर लगेच महिला उद्योजक शिबिराला सुरुवात झाली. शिबिरात नाबार्डचे जयंत सोनटक्के व गणेश आत्राम यांनी महिलांना बचत गटासाठी असलेले विविध लघूउद्योग, कर्जवाटप इत्यादींची माहिती दिली. या कार्यक्रमानंतर आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबीयांना बी-बियाणे किटचे वाटप करण्यात आले. यावेळी वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबातील व्यक्ती उपस्थित होत्या. यासह ग्रामीण रुग्णालयात फळवाटप वाटप करण्यात आले. रक्तदान शिबिरासाठी लाईफलाईन नागपूरच्या टीमने सहकार्य केले. 

या सोहळ्याला प्रमोद वासेकर, पुरुषोत्तम आवारी, प्रशांत गोहोकार, राजाभाऊ पाथ्रडकर, वंदना आवारी, साधना गोहोकार, आशा टोंगे, अर्चना बोदाडकर, काजल शेख, विजया आगबत्तलवार, शारदा ठाकरे, रवि कोटावार, राजू अंकतवार, अशोक चिकटे, तेजराज बोढे, अनिल भोयर , सुनिल वारारकर, जयसिंग गोहोकार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय खाडे फाउंडेशनची चमू तसेच जय जगन्नाथ मल्टिस्टेट व श्री लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे कर्मचारी वृंद यांनी परीश्रम घेतले.


संजय खाडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम घेऊन साधेपणाने साजरा संजय खाडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम घेऊन साधेपणाने साजरा Reviewed by सह्याद्री चौफेर on May 25, 2025 Rating: 5
Powered by Blogger.