सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : मारेगाव तालुक्यातील पाथरी येथे एका शेतात कृषी विभागाने कारवाई करीत 15 बोगस बियानाचे पॉकेट व दोन दुचाकी सह एकूण 2,38,515/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कृषी विभागाच्या या कारवाईने बोगस बियाणे विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहेत.
कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पाथरी येथील बंडू संभाजी पेचे यांच्या मालकीच्या शेतात बोगस बियाणे विक्रीकरिता असल्याचे समजले, यावरून कृषी विभागाने पाथरी येथील शेतात धाड टाकीत गॅलेक्सी हायपर कॉटन हायब्रीड सीड्स बोगस बियानाचे 15 पॉकेट व दोन मोटारसायकली अंदाजे किं. 2,38,515/- रुपयाचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त केला. तीन पॉकेट बीज परीक्षणाकरिता नागपूर येथे पाठवण्यात आले.
याप्रकरणी संशयित आरोपी सम्राट पेचे वर बियाणे अधीनियम 1968 चे कलम 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 नुसा लेबलमध्ये उत्पादक व त्याचे गुणवत्तेसाठी जबाबदार उत्पादकाचा उल्लेख नसल्याने सदर नियमांचे उल्लंघन केले आहे. (2) विना परवाना बियाणे साठवणुक व विक्री केल्याने बियाणे कायदा 1966 चे कलम 7 चे व (3) महाराष्ट्र कापुस बियाणे कायदा (पुरवठा, वितरण, विक्री व किंमतीचे निश्चीतीकरण याचे विनीयमन) 2009 व 2010 चे उल्लघन केले आहे. 3) (Genetic Engineening Approval Committe) GEAC च्या मान्यतेचा उल्लेख नसल्याने पर्यावरण संरक्षण कायदा 1986 नुसार कलम 7,8,15 (1), 15(2), 16(1) अन्वये तरतुदीचे उल्लघन केले आहे,
त्यामुळे बंदी असलेले बियाणे शेतकऱ्यांना अनधिकृतपणे विक्री करण्याचे उद्देशाने आणल्याने भा. न्या.सं. कायदा 2023 चे कलम 318(4), 3(5) प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपी पसार झाले आहेत. सदरची कारवाई पंचायत समिती मारेगावचे कृषी अधिकारी संदीप वाघमारे, तालुका कृषी अधिकारी दिपाली खवले, सहायक पोलीस निरीक्षक अजय वाढवे, स्था.गु. शा. चे सुधीर पांडे, सलमान शेख, रजनीकांत मडावी, नरेश राऊत यांनी केली आहे.
पाथरीत बोगस बियाणे विक्रेत्यावर कारवाई
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 26, 2025
Rating: