सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक व वाहक भरती त्वरीत करण्यात यावी अशी मागणी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार यांच्या वतीने राज्य परिवहन मंत्र्याकडे करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात गेल्या ५ वर्षापासून चालक-वाहक भरती करण्यात आलेली नाही. सर्व आगारामध्ये चालक वाहकांची कमतरता आहे. महाराष्ट्रात सर्व आगारात लालपरी उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. परंतु चालक वाहकांची कमतरता असल्यामुळे बऱ्याच फेऱ्या रद्द कराव्या लागतात. त्यामूळे प्रवाशांना प्रवास करणे कठीण झाले आहे. सद्याच्या परिस्थितीत शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांकरीता सुरू असलेल्या बसेस बंद आहे. तसेच पुढच्या महिन्यात शाळा पूर्ववत सुरू होणार असल्यामुळे चालक व वाहक कमी पडणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात चालक- वाहक पुढच्या महिन्यात सेवानिवृत्त होणार आहे. नबिन बसफेऱ्या प्रत्येक आगारात सुरू झाल्या परंतु चालक- वाहक नसल्यामुळे प्रवाशांना प्रवास करणे कठीण झाले आहे. करिता मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या वतीने आपणांस नम्र विनंती करण्यात येते की, महाराष्ट्रात चालक -वाहक भरती त्वरीत करण्यात यावी. अशाप्रकारचे निवेदन मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजु धावंजेवार यांच्या नेतृत्वात परिवहन मंत्र्याकडे पाठविण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक व वाहक भरती त्वरीत करा - राजु धावंजेवार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 26, 2025
Rating: