सोनूपोडमध्ये गोमांस विकणाऱ्या दोघांना अटक


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : पोलिसांनी १५ किलो गोमांस जप्त केले. तसेच दोघांना ताब्यात घेतले. या गोमांसासह तीन हजार रूपयेचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.

प्राप्त माहितीनुसार दि. २६ नोव्हेंबरला तालुक्यातील सोनुपोड येथे शेख सिलेमान व त्याचा मुलगा शेख रिजवान गोमांस विक्री करत असल्याची माहिती मारेगांव पोलीसांना खबऱ्यामार्फत मिळाली. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी साडेसात वाजता च्या सुमारास सोनुपोड येथे जावून पोलिसांनी छापा मारला.

गुरांची कत्तल करून गोमांस विक्री करत असलेले आढळले असता पंचनामा करून आरोपिंना ताब्यात घेत, १५ किलो बैलच्या मासासह ३५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला, घटनेचा लेखी रिपोर्ट पोहेकॉ रजनिकांत पाटील यांनी नोंद करून कलम ५ (क) (ड) महाराष्ट्र प्राणी रक्षण सुधारणा कायदा १९९५ प्रमाणे कारवाई करण्यात आली.
सोनूपोडमध्ये गोमांस विकणाऱ्या दोघांना अटक सोनूपोडमध्ये गोमांस विकणाऱ्या दोघांना अटक Reviewed by सह्याद्री चौफेर on November 26, 2024 Rating: 5
Powered by Blogger.