"विधी क्षेत्रातून जनसामान्यांच्या हिताचा वारसा पुढे चालवा!" : सहाय्यक शासकीय अभियोक्ता ॲड. अरुण मोहोड यांचे प्रतिपादन


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : "विधी क्षेत्राला मोठा ऐतिहासिक वारसा असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी आदींनी वकीली क्षेत्राला मोठा नावलौकिक मिळवून दिलेला आहे. वकील हे सामाजिक अभियंता म्हणून भूमिका निभावत असुन माझ्या कनिष्ठ वकिलांनी देखील विधी क्षेत्रातून जनसामान्यांच्या हिताचा वारसा पुढे चालवावा", असे प्रतिपादन सहाय्यक शासकीय अभियोक्ता ॲड. अरुण मोहोड यांनी केले. संविधान दिनाचे औचित्य साधून ॲक्विटस लिगल सोल्युशन्सच्या नविन कार्यालयाचे उद्घाटनप्रसंगी ॲड.अरुण मोहोड यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले.

ॲड. निखिल सायरे यांच्या संकल्पनेतून व ॲड. रंजित अगमे व ॲड. श्रीकृष्ण खोब्रागडे यांच्या सहकार्याने ॲक्विटस लिगल सोल्युशन्सची स्थापना केली असुन व याचे नविन कार्यालय यवतमाळ येथील चापनवाडी येथे सुरू केले. भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून ॲक्विटस लिगल सोल्युशन्सच्या नविन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. याकरीता डॉ. सुमेध जाधव (आय.पि.एस.) हे उद्घाटक म्हणून तर श्रीधर कोहरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, यवतमाळ अर्बन को-ऑप. बॅंक लि. यवतमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. तर अध्यक्षस्थानी सहाय्यक शासकीय अभियोक्ता ॲड.अरुण मोहोड हे होते. डॉ. सुमेध जाधव (आय.पि.एस.) व श्रीधर कोहरे यांनी ॲक्विटस लिगल सोल्युशन्सच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व समायोजित मार्गदर्शन देखील केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. निखिल सायरे, प्रास्ताविक ॲड.‌ रंजित अगमे यांनी तर आभारप्रदर्शन ॲड. श्रीकृष्ण खोब्रागडे यांनी केले.

कार्यक्रमास सर्वश्री सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामजी राऊत, दै. अमरावती मंडलचे जिल्हा प्रतिनिधी विजय बुंदेला, यवतमाळ अर्बन को ऑप बॅंकेचे व्यवस्थापक राजेंद्र खोतकर, यवतमाळ जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष संजय जैन, सचिव मनमोहन ठाकरे, अश्विन‌ सव्वालाखे, ॲड. श्रेया आनंद, बाल कल्याण समितीचे डायरे, भगवान अगमे, सौ. अगमे, सौ. खोब्रागडे, श्रीमती निशा‌ सायरे, अशोक सहारे, दिनेश बोटरे, सौ. गौरी बोटरे, अमर शिंदे, राजु बुल्हे, रजनी बुल्हे, नितीन नेवारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी भुषण ब्राह्मणे, प्रज्वल सहारे, प्रणव देशपांडे, काजल अगमे यांनी अथक परिश्रम घेतले.

"विधी क्षेत्रातून जनसामान्यांच्या हिताचा वारसा पुढे चालवा!" : सहाय्यक शासकीय अभियोक्ता ॲड. अरुण मोहोड यांचे प्रतिपादन "विधी क्षेत्रातून जनसामान्यांच्या हिताचा वारसा पुढे चालवा!" : सहाय्यक शासकीय अभियोक्ता ॲड. अरुण मोहोड यांचे प्रतिपादन Reviewed by सह्याद्री चौफेर on November 27, 2024 Rating: 5
Powered by Blogger.