सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या नवरगाव येथील एका 21 वर्षीय युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जिवन यात्रा संपवल्याची घटना शनिवार दि. 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी उघडकीस आली.
खुशी सुभाष मोहुर्ले रा. नवरगाव (धरण),असे घरात गळफास लावून आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे.आई सकाळी कामाला गेली होती, ती सायंकाळी कामावरून घरी परतली असता घरात मुलगी दोरीच्या सहाय्याने गळफास अवस्थेत आढळून आली. ही दुःखद वार्ता कळताच गावकरी घटनास्थळी जमली,युवतीला रुग्णालयात हलविले डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. ख़ुशी ही शेजारच्या वणी तालुक्यात अकॅडमी प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेत असल्याचे समजते.
मुतकाच्या पश्चात आई व दोन विवाहित बहिणी असून वडिलांचे निधन झाले आहे. सध्या खुशीच्या आत्महत्येचे कारण अस्पस्ट असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव रुग्णालयात पाठविण्यात आला. पुढील तपास पोलीस करित आहे.
21 वर्षीय युवतीची गळफास घेऊन आत्महत्या
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 24, 2024
Rating: