सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
विशेष म्हणजे देरकरांनी पहिल्या फेरी पासूनच मतांचा जोर पकडला होता, त्यानंतरही मतांचा आकडा फुगत गेला आणि दहाव्या फेरीनंतर संजय देरकर यांच्या विजयाची घोडदौड सुरु झाली. यामध्ये काँग्रेस ठाम राहिल्यामुळे शिवसेना उबाठाचे उमेदवार विजयी झाल्याचे देखील बोललं जात होत. प्रत्येक फेरीचे आकडे व दर मिनिटाला येणारी देरकरांची आघाडी, वणी मतदार संघातील नागरिकांची उत्कंठा वाढवत होती. बहुमताच्या आघाडीमुळे विजय निश्चित शिगेला पोहचली होता.अखेर संजीवरेड्डी बोदकुरवार यांना मात देत संजय देरकर यांनी 15560 मतांनी दणदणीत विजय मिळविला आहे. त्यांचं वणी विधानसभा क्षेत्रात नवनिर्वाचित आमदार म्हणून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पहा कुणाला किती मते मिळाली
अरुणकुमार खैरे (बसपा) 1163, राजू उंबरकर (मनसे) 21977, संजय देरकर (शिवसेना उबाठा) 94618, संजीवरेड्डी बोदकुरवार (भाजप) 79058, अनिल हेपट (भाकप) 3875, राजेंद्र निमसटकर (वंचित बहुजन आघाडी) 3605, अपक्ष राहुल आत्राम 2532, संजय खाडे 7540, केतन पारखी 407, नारायण गोडे 855, हरिष पाते 1307, निखिल ढुरके 2246 असे मते मिळाली. तर नोटा 1328.
वणी विधानसभेत संजय देरकर 15560 मतांनी विजयी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 23, 2024
Rating: