नायब तहसीलदारांनी पारधी बेड्यावर आणून दिले रेशन कार्ड

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : स्वातंत्र्याचा ७५ वर्षानंतरही जनतेला अजूनही मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध होत नाही, साधे रेशन कार्ड साठी सात दशकांची वाट पाहावी ही या देशासाठी शोकांतिका आहे. लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालविलेली गेलेली लोकशाही आपल्या देशात असताना लोकच जर प्राथमिक कागदपत्रे मिळविण्यासाठी संघर्ष करन्याची वेळ येणे ही लोकशाहीसाठी दुःखदायक आहे. मेंढोली येथे वनात शिकार करीत गुजराण करणारा पारधी समाज मुख्य प्रवाहात येण्यासाठी १५ - २० वर्षापासून झोपड्या बांधून राहून, शेती करून आपल्या मुलांना शिकवीत आहेत. परंतु त्यांना प्रशासनाकडून प्राथमिक नागरी सुविधा उपलब्ध न झाल्याने त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा नेतृत्वातील आमरण उपोषण केल्याने शेवटी स्थानिक स्वराज्य संस्था व तहसील प्रशासनाने दखल घेत त्यांच्या समस्यांची सोडवणूक केली. एवढेच नाही तर दस्तुरखुद्द  वणी तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार पांडे हे पारधी बेड्यावर उपस्थित होऊन तेथील आंदोलनकर्ते २४ कुटुंबांना रेशनकार्ड चे वाटप करून येत्या १ महिन्यात धान्याचे वाटप सुरू होईल असे सांगितले.      
एप्रिल महिन्यातील २८ तारखेला मेंढोली येथील पारधी समाजाचा २४ कुटुंबांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जि. क. सदस्य कॉ. मनोज काळे व शाखा सचिव कॉ. प्रकाश घोसले यांचे नेतृत्वात गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित जमिनीचा हक्क, गाव नमुना ८ अ, घरकुल, रेशनकार्ड ह्या मागण्यांना घेऊन आमरण उपोषणाला पारधी समाजातील मालाबाई घोसले, राजमल घोसले, अनारशा काळे, सुनीता घोसले बसले होते. त्यावेळेस माकपचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी हे उपस्थित राहून त्यांनी पारधी समाजातील लोकांना मार्गदर्शन करून पाठिंबा व्यक्त केला होता. ह्या उपोषणाची दखल घेत ग्रामपंचायतीच्या सरपंच, सचिव उपसरपंच ह्यांनी गाव नमुना ८ -अ व घरकुलाचा प्रश्नाचे निराकरण केले होते. तर तहसील प्रशासनाने मंडळ अधिकारी बांगडे यांना पाठवून प्रश्न मार्गी लागल्याचे आश्वासन देऊन उपोषणाची सांगता केली होती. ह्या आश्वासनाला गंभीर राहून वणी तहसीलचे नायब तहसीलदार पांडे यांनी आपले वचन पाळीत स्वतः मेंढोली गावातील पारधी बेड्यावर जाऊन त्यांचा समस्या जाणून घेऊन, त्यांच्याशी संवाद साधित रेशनकार्ड चे वितरण केले तसेच एका महिन्याचा आत रेशन चालू करण्याचे आश्वासन दिले.


नायब तहसीलदार मा. श्री. पांडे साहेब यांनी स्वतः येऊन मेंढोली येथील पारदी बेड्यला भेट देऊन आम्हा आदिवासी लोकांशी चर्चा करून त्यानी आम्हाला राशन कार्ड वितरित केले त्याचे मनापासून आभार...

मोहदा येथे भीषण आग, आगीत संपूर्ण खानावळ व सलून जळून खाक

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : मोहदा येथील एका खानावळ ला मंगळवारी (6 मे) पहाटे आग लागली. ही आग एवढी भीषण होती की खानावळ आगीत पूर्णपणे जळून खाक झालं. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी तसेच कोणीही जखमी झालं नसल्याची माहिती उपसरपंच सचिन रासेकर यांनी दिलीय. 
वणी तालुक्यातील मोहदा येथे पहाटे 4 वाजताच्या सुमारास मोहदा बस स्टॉप जवळ असलेल्या सुनीता रमेश काळे ह्या महिलेच्या खानावळ मध्ये प्रथम आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केल्याने बाजूला असलेल्या सलूनलाही आग लागली. त्यानंतर आग लागल्याची माहिती उपसरपंच सचिन रासेकर यांना कळताच यांनी आमदार संजय देरकर यांना सांगितली, आमदारांनी तत्काळ अग्निशमन विभागाला कळवली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. 
या आगीची भीषणता इतकी मोठी होती की, या आगीवर नियंत्रण मिळवण्यात स्थानिकांना आज पहाटे एक ते दीड तास तारेवरची कसरत करावी लागले, त्यानंतर अग्निशमन दल पोहचले, सहा वाजता अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. दरम्यान, या आगीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. तर या घटनेत खानावळ संचालक सुनीता रमेश काळे व सलून व्यावसायिक ओमप्रकाश विनोद नक्षीने या दोघांचं मोठं आर्थिक नुकसान झाले आहे.

सुनीता काळे या विधवा महिलेच्या खानावळ मधील रोख रक्कम, फ्रिज, कुलर, पाण्याचे ड्रम इतर साहित्य जळून खाक झाले. तर सलून चालक ओमप्रकाश नक्षीने यांचे सलून दुकानातील खुर्च्या, फर्निचर चे मोठे नुकसान झाल्याचे माहिती आहे.  

ब्राम्हणी फाट्यावर मोटारसायकलला अपघात

संग्रहीत छायाचित्र

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शेतकरी नेते देवराव धांडे यांच्या मोटारसायकलचा अपघात झाला आहे. मुळगावाहुन वणीकडे येत असताना धांडे यांच्या दुचाकीला भरधाव वेगातील मालवाहूने मागून धडक दिली. दरम्यान, या दुर्घटनेत दुचाकीवरील पत्नी मालन देवराव धांडे (65) रा. वारगाव ह्या जागीच ठार झाल्या तर चालक देवराव धांडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.
धांडे दाम्पत्य हे आपल्या दुचाकीने वारगाव वरून वणीला येत होते. दरम्यान, ब्राह्मणी फाट्यावरून शहराकडे जाण्याकरिता वळण घेत असतांना घुग्गुस कडून भरधाव येणाऱ्या मालवाहू ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिली. यात मागे बसून असलेल्या मालन धांडे या ट्रकच्या धडकेने चक्याखाली आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, मोटारसायकल चालक देवराव धांडे हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ उपचारार्थ हलविण्यात आले. 

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ दाखल होताच सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

वणीत पुन्हा घरफोडी, लाखोंचा मुद्देमाल चोरीला

संग्रहीत छायाचित्र

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : वणी येथे पुन्हा घरफोडीची घटना घडली असून, चोरट्यांनी 3,01,500/-रुपयेचा मुद्देमाल लंपास केला आहे. या घरफोडीत सोन्याचे दागिने आणि घरगुती वापरातील साहित्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. ही घटना 2 ते 3 मे रोजी सकाळी अकरा ते आठ या कालावधीत घडली. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिभाऊ झमाजी विखलेरा. रा.गुरूनगर, वणी (वय 82), सेवानिवृत्त शिक्षक हे नागपुर येथे गेले असता नागपुर वरुन परत आले तेव्हा त्यांना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून दिसले. त्यांनी घरात प्रवेश करताच घरातील अनेक वस्तू चोरी गेल्याचे लक्षात आले. यात 1 सोन्याची पोत 3.5 तोळे, किंमत अंदाजे 2,00,000/- रुपये,1 सोन्याचा गोफ 1.5 तोळे किंमत अंदाजे 45,000/-रुपये, एक सोन्याचा गोफ 7 ग्रॅम व त्यात लॉकेट 1.5 ग्रॅम किंमत अंदाजे 30,000/- रुपये,1 सोन्याची अंगठी 3.5 ग्रॅम किंमत अंदाजे 10,000/- रुपये,1 टेबल फॅन जुना वापरता किंमत अंदाजे 500/- रुपये, 2 सिंलीग फैन किंमत अंदाजे 1000/- रुपये,1 पाण्याची मोटर किंमत अंदाजे 1000/-रुपये., ताब्याचे तीन गुंड व तीन लोटे व लहान मोठे तांब्याची पुजेचे गंगाळ, ताब्याचे पाणी गरम करण्याचे बंब्या किंमत अंदाजे 2000/-रुपये काश्याचे दोन ताट, दोन वाट्या, दोन प्लेटा, दोन चम्मच, दोन ग्लास, एक लोटा किंमत अंदाजे. 2000/-रुपये तसेच पितळेचे सहा ताट, सहा वाट्या, सहा प्लेटा, आठ गंज, आठ ताटल्या, नऊ डब्बे, चार ग्लास, पितळेचे लहान, मोठे सात गुंड, पितळेचा लोटा, पितळेची बकेट, पितळेचे अत्तरदानी, तीन पितळेचे कोपर एक पितळेची गंगाळ किंमत अंदाजे 10,000/- रुपये असा एकुण 3,01,500/-रुपयेचा मुद्देमाल कोणीतरी चोरुन नेल्याचे लक्षात आल्यानंतर श्री.विखले सेवानिवृत्त शिक्षक यांनी ठाण्यात धाव घेत घटनेबाबत तक्रार दिली. 
फिर्यादीने दिलेल्या जबानी रिपोर्ट वरून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 331 (3), 331(4), 305(A) BNS नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पि एस आय (PSI) रायबोले मॅडम यासह पोलीस स्टेशन वणी करत आहे.

वणी शहरात अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून पोलिसांसमोर यावर नियंत्रण मिळवण्यासाठी चांगलेच आव्हान उभे ठाकले आहे. एकामागून एक सतत घटना घडत आहे. स्थानिकांच्या उरात चांगलीच धडकी भरली आहे. आता कोणाच्या घरावर हे चोरटे डल्ला मारतील याबाबत धाकधूक वाढल्याने नागरिकात भीती निर्माण झाली आहे. 

रेल्वेने कटून 20 वर्षीय मुलीचा मृत्यू

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : रेल्वेने कटून एका 20 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज 5 मे ला सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान, वणी रेल्वे स्टेशन जवळ घडली असून या दुःखद घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. 
रश्मी धनराज पराते रा. शास्त्री नगर,ता.वणी असे या मृत युवतीचे नाव आहे. ती रेल्वखाली कशी आली याबाबत अस्पष्टता असली तरी मात्र,तीने रेल्वखाली झोकून दिल्याचे शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ही तरुणी रेल्वेखाली आल्याने तिचे शीर धडा वेगळे झाले होते. मुलीच्या अशा या दुर्दवी मुत्यूने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच एपीआय धिरज गुल्हाने, सुदामा आसोरे, अपसुंदे यांच्यासह जमादार अविनाश बनकर हे ताबडतोब घटनास्थळी पोहचले. तसेच स्टेशन मास्टर प्रेम कुमार रंजन हे देखील घटनास्थळी उपस्थित होते. तर रेल्वे पोलिसांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. 
दरम्यान, घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.पुढील तपास पोलिस करीत आहे.