नायब तहसीलदारांनी पारधी बेड्यावर आणून दिले रेशन कार्ड

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : स्वातंत्र्याचा ७५ वर्षानंतरही जनतेला अजूनही मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध होत नाही, साधे रेशन कार्ड साठी सात दशकांची वाट पाहावी ही या देशासाठी शोकांतिका आहे. लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालविलेली गेलेली लोकशाही आपल्या देशात असताना लोकच जर प्राथमिक कागदपत्रे मिळविण्यासाठी संघर्ष करन्याची वेळ येणे ही लोकशाहीसाठी दुःखदायक आहे. मेंढोली येथे वनात शिकार करीत गुजराण करणारा पारधी समाज मुख्य प्रवाहात येण्यासाठी १५ - २० वर्षापासून झोपड्या बांधून राहून, शेती करून आपल्या मुलांना शिकवीत आहेत. परंतु त्यांना प्रशासनाकडून प्राथमिक नागरी सुविधा उपलब्ध न झाल्याने त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा नेतृत्वातील आमरण उपोषण केल्याने शेवटी स्थानिक स्वराज्य संस्था व तहसील प्रशासनाने दखल घेत त्यांच्या समस्यांची सोडवणूक केली. एवढेच नाही तर दस्तुरखुद्द  वणी तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार पांडे हे पारधी बेड्यावर उपस्थित होऊन तेथील आंदोलनकर्ते २४ कुटुंबांना रेशनकार्ड चे वाटप करून येत्या १ महिन्यात धान्याचे वाटप सुरू होईल असे सांगितले.      
एप्रिल महिन्यातील २८ तारखेला मेंढोली येथील पारधी समाजाचा २४ कुटुंबांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जि. क. सदस्य कॉ. मनोज काळे व शाखा सचिव कॉ. प्रकाश घोसले यांचे नेतृत्वात गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित जमिनीचा हक्क, गाव नमुना ८ अ, घरकुल, रेशनकार्ड ह्या मागण्यांना घेऊन आमरण उपोषणाला पारधी समाजातील मालाबाई घोसले, राजमल घोसले, अनारशा काळे, सुनीता घोसले बसले होते. त्यावेळेस माकपचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी हे उपस्थित राहून त्यांनी पारधी समाजातील लोकांना मार्गदर्शन करून पाठिंबा व्यक्त केला होता. ह्या उपोषणाची दखल घेत ग्रामपंचायतीच्या सरपंच, सचिव उपसरपंच ह्यांनी गाव नमुना ८ -अ व घरकुलाचा प्रश्नाचे निराकरण केले होते. तर तहसील प्रशासनाने मंडळ अधिकारी बांगडे यांना पाठवून प्रश्न मार्गी लागल्याचे आश्वासन देऊन उपोषणाची सांगता केली होती. ह्या आश्वासनाला गंभीर राहून वणी तहसीलचे नायब तहसीलदार पांडे यांनी आपले वचन पाळीत स्वतः मेंढोली गावातील पारधी बेड्यावर जाऊन त्यांचा समस्या जाणून घेऊन, त्यांच्याशी संवाद साधित रेशनकार्ड चे वितरण केले तसेच एका महिन्याचा आत रेशन चालू करण्याचे आश्वासन दिले.


नायब तहसीलदार मा. श्री. पांडे साहेब यांनी स्वतः येऊन मेंढोली येथील पारदी बेड्यला भेट देऊन आम्हा आदिवासी लोकांशी चर्चा करून त्यानी आम्हाला राशन कार्ड वितरित केले त्याचे मनापासून आभार...

नायब तहसीलदारांनी पारधी बेड्यावर आणून दिले रेशन कार्ड नायब तहसीलदारांनी पारधी बेड्यावर आणून दिले रेशन कार्ड Reviewed by सह्याद्री चौफेर on May 06, 2025 Rating: 5
Powered by Blogger.