सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : मोहदा येथील एका खानावळ ला मंगळवारी (6 मे) पहाटे आग लागली. ही आग एवढी भीषण होती की खानावळ आगीत पूर्णपणे जळून खाक झालं. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी तसेच कोणीही जखमी झालं नसल्याची माहिती उपसरपंच सचिन रासेकर यांनी दिलीय.
वणी तालुक्यातील मोहदा येथे पहाटे 4 वाजताच्या सुमारास मोहदा बस स्टॉप जवळ असलेल्या सुनीता रमेश काळे ह्या महिलेच्या खानावळ मध्ये प्रथम आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केल्याने बाजूला असलेल्या सलूनलाही आग लागली. त्यानंतर आग लागल्याची माहिती उपसरपंच सचिन रासेकर यांना कळताच यांनी आमदार संजय देरकर यांना सांगितली, आमदारांनी तत्काळ अग्निशमन विभागाला कळवली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.
या आगीची भीषणता इतकी मोठी होती की, या आगीवर नियंत्रण मिळवण्यात स्थानिकांना आज पहाटे एक ते दीड तास तारेवरची कसरत करावी लागले, त्यानंतर अग्निशमन दल पोहचले, सहा वाजता अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. दरम्यान, या आगीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. तर या घटनेत खानावळ संचालक सुनीता रमेश काळे व सलून व्यावसायिक ओमप्रकाश विनोद नक्षीने या दोघांचं मोठं आर्थिक नुकसान झाले आहे.
सुनीता काळे या विधवा महिलेच्या खानावळ मधील रोख रक्कम, फ्रिज, कुलर, पाण्याचे ड्रम इतर साहित्य जळून खाक झाले. तर सलून चालक ओमप्रकाश नक्षीने यांचे सलून दुकानातील खुर्च्या, फर्निचर चे मोठे नुकसान झाल्याचे माहिती आहे.
मोहदा येथे भीषण आग, आगीत संपूर्ण खानावळ व सलून जळून खाक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 06, 2025
Rating: