टॉप बातम्या

ब्राम्हणी फाट्यावर मोटारसायकलला अपघात

संग्रहीत छायाचित्र

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शेतकरी नेते देवराव धांडे यांच्या मोटारसायकलचा अपघात झाला आहे. मुळगावाहुन वणीकडे येत असताना धांडे यांच्या दुचाकीला भरधाव वेगातील मालवाहूने मागून धडक दिली. दरम्यान, या दुर्घटनेत दुचाकीवरील पत्नी मालन देवराव धांडे (65) रा. वारगाव ह्या जागीच ठार झाल्या तर चालक देवराव धांडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.
धांडे दाम्पत्य हे आपल्या दुचाकीने वारगाव वरून वणीला येत होते. दरम्यान, ब्राह्मणी फाट्यावरून शहराकडे जाण्याकरिता वळण घेत असतांना घुग्गुस कडून भरधाव येणाऱ्या मालवाहू ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिली. यात मागे बसून असलेल्या मालन धांडे या ट्रकच्या धडकेने चक्याखाली आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, मोटारसायकल चालक देवराव धांडे हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ उपचारार्थ हलविण्यात आले. 

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ दाखल होताच सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.
Previous Post Next Post