रेल्वेने कटून 20 वर्षीय मुलीचा मृत्यू

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : रेल्वेने कटून एका 20 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज 5 मे ला सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान, वणी रेल्वे स्टेशन जवळ घडली असून या दुःखद घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. 
रश्मी धनराज पराते रा. शास्त्री नगर,ता.वणी असे या मृत युवतीचे नाव आहे. ती रेल्वखाली कशी आली याबाबत अस्पष्टता असली तरी मात्र,तीने रेल्वखाली झोकून दिल्याचे शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ही तरुणी रेल्वेखाली आल्याने तिचे शीर धडा वेगळे झाले होते. मुलीच्या अशा या दुर्दवी मुत्यूने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच एपीआय धिरज गुल्हाने, सुदामा आसोरे, अपसुंदे यांच्यासह जमादार अविनाश बनकर हे ताबडतोब घटनास्थळी पोहचले. तसेच स्टेशन मास्टर प्रेम कुमार रंजन हे देखील घटनास्थळी उपस्थित होते. तर रेल्वे पोलिसांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. 
दरम्यान, घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.पुढील तपास पोलिस करीत आहे.
रेल्वेने कटून 20 वर्षीय मुलीचा मृत्यू रेल्वेने कटून 20 वर्षीय मुलीचा मृत्यू Reviewed by सह्याद्री चौफेर on May 05, 2025 Rating: 5
Powered by Blogger.