शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या अन्यथा आंदोलन छेडू - तालुका काँग्रेस कमिटीचे उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 
 
वणी : विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात महायुतीने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ असे आश्वासन दिले होते. आणि शेतकऱ्यांनी भरभरून मतदान करून महायुतीचे सरकार स्थापन झाले. मात्र सरकारला आता आपल्या दिलेल्या वचनांचा विसर पडत चालला की काय असेच दिसत आहे. सरकारने अजूनही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केलेली नाही त्यामुळे सरकारला केलेल्या घोषणेचा विसर पडला की काय शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी कधी देणार असा प्रश्न वणी तालुका काँग्रेस कमिटीने उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्जाच्या डोंगराखाली दबलेला आहे. खरीप हंगाम 2025 काही महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या तोंडावर आहे व त्यांच्या समोर मोठी समस्या म्हणजे शेती करिता झालेला खर्च व उत्पन्न याचा ताळमेळ लावला तर खर्चापेक्षा उत्पन्न कमी, असे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे. त्यामुळे पुढील हंगामातील शेती कशी करायची व शेतीला खर्च कसा लावायचा या विवंचनेत शेतकरी आहे. वणी झरी, मारेगाव परिसरात काँग्रेस कमिटीने दौरे करून माहिती गोळा केली असता, असे दिसून आले की परिसरातील शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे उत्पादन खर्चात झालेली वाढ, बी - बियाणे व खताच्या किमतीत झालेली वाढ आणि शेतमालाला मिळणारा अत्यल्प भाव, शेतीकरिता मजुरांची कमतरता, परिणामी मजुरीचे दरात झालेली वाढ या कारणामुळे शेतकऱ्यांकडे घेतलेले कर्ज भरण्याची ऐपत राहिली नाही. त्यामुळे बरेच शेतकरी पुढील शेती कशी करायची बँकेचे कर्ज कसे फेडायचे, मुलीचे लग्न आणि बारा महिन्यांचा शेतीचा व प्रपंचाचा खर्च कसा चालवायचा या विवंचनेत आत्महत्येला सुद्धा सामोर जात आहे. 

महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची घोषणा केल्यामुळे सरकार मायबाप सरसकट कर्जमाफीची घोषणा करेल या आशेवर शेतकरी सरकारकडे चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. तरी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी वणी तालुका काँग्रेस कमिटीचे वणी उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. येत्या पंधरा दिवसात जर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली नाही तर मोठे आंदोलन उभारण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना व शासकीय कामाकरिता रेती उपलब्ध करून द्या - सरपंच संघटनेची मागणी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

यवतमाळ : जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना व शासकीय कामाकरिता रेती उपलब्ध करून द्यावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुकाराम माथनकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
 
यवतमाळ जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रमाई, शबरी, आदीम, मोदी आवास व पंतप्रधान आवास योजना मंजूर झाल्या असून रेती अभावी घरकूल योजनेचे सर्व कामे व ग्राम पंचायत स्तरावरील शासकीय विकासात्मक कामे रखडलेले आहे. यवतमाळ जिल्हा विभागामध्ये १६ तालूके असून प्रत्येक तालूक्यामध्ये २ रेती घाट घरकूल योजना व ग्राम पंचायत अंतर्गत शाककीय विकासात्मक कामाकरीता राखीव देण्यात यावे. याआधी सरपंच संघटनेच्या वतिने दिनांक ११ फेब्रुवारी २०२५ ला निवेदन देण्यात आले होते,मात्र यवतमाळ जिल्ह्यातील रेती घाट अद्याप सूरू करण्यात आलेले नाही. १५ दिवसाच्या आत रेती घाट सूरू न केल्यास महाराष्ट्र प्रदेश संघटना यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने तिर्व आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदन देतेवेळी जिल्हा अध्यक्ष तुकाराम माथनकर, सौ सविता जाधव जिल्हा महामंत्री, निलेश पिंपळकर यवतमाळ तालुका अध्यक्ष उमेश राठोड, प्रमोद नाटकर व जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते.

कुमार चिंता पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांचेतर्फे यवतमाळकरांना आवाहन व निर्देश

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

यवतमाळ : यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या मार्फतीने यवतमाळ जिल्हयातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, नागपुर शहरात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभुमीवर कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणारे किंवा दोन धर्मामध्ये तेढ पसरविणारे आक्षेपार्ह मॅसेज, इमेजेस, व्हिडीओज घटनेची व माहितीची शहानिशा न करता व्हॉटसअॅप, फेसबुक, व्टिटर, इन्स्टाग्राम व ईतर सोशल मिडीया माध्यमांवर पोस्ट प्रसारीत करु नये. कोणत्याही अफवा पसरवु नये. अशा कोणत्याही पोस्टमुळे दोन व्यक्ती, समाज, धर्म पंथ अशांच्या भावना दुखावुन समाजात तणाव निर्माण होवुन कोणतीही अनुचित घटना घडल्यास सदर पोस्ट करणाऱ्या इसमांस गुन्हा करण्यास प्रवृत्त केल्याचे समजुन त्यावर कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

यवतमाळ जिल्हयात सर्व ठिकाणी चोख बंदोबस्त नेमण्यात आलेला असुन सर्व पोलीस दल सतर्क आहे. तसेच सोशल मिडीया मॉनीटरींग सेल स्थापन करण्यात आला असुन सर्व व्हॉटसअॅप, फेसबुक, व्टिटर, इन्स्टाग्राम व ईतर सोसल मिडीया माध्यमांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. याव्दारे यवतमाळ जिल्हयातील सर्व नागरींकाना निर्देश देण्यात येते की, नागपुर शहरातील झालेल्या घटनेच्या संदर्भाने खोटे मॅसेज व अफवा सोशल मिडीयावर पसरविण्यास तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल करणाऱ्या व संबधीत ग्रुप अॅडमीन यांना जबाबदार धरण्यात येईल असे कृत्य करणाऱ्यास महाराष्ट्र पोलीस कायदा तसेच भारतीय न्याय संहीता प्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, तरी सर्व व्हॉटसअॅप अॅडमीन यांना सुचित करण्यात येते की, आपण सर्वांनी यवतमाळ जिल्हयामध्ये शांतता व सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोलीस दलास सहकार्य करावे.

घरातील हंडा काढावं लागतं, 44 वर्षाच्या इसमाला लाखात फसवले

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : घरात सोन्याचा हंडा असल्याचे आमिष दाखवत वणी तालुक्यातील एका व्यक्तीला लाखों रुपये उकळून फसवणूक केल्याप्रकरणी एका ठगासह दोघांना वणी पोलिसांनी अटक केली आहे. 

४४ वर्षांच्या इस्माला गुप्तधन काढावं लागतं, अन्यथा तुमच्यासोबत, तुमच्या कुटुंबातील लोकांसाबात बरंवाईट होईल अशी भीती देऊन त्याच्याकडून महिनाभरात तब्बल १ लाख ६५ हजार रुपये व ११.३४० ग्रॅम सोन्याचा नेकलेस उकळले आहेत. ही घटना तालुक्यातील एका गावात घडली आहे. 

फिर्यादीच्या तक्रारीवरून असे की,फिर्यादीला दोन महिनेपूर्वी सांगितले की, तुमच्या घरामध्ये सोन्याची हंडी आहे, ती तूम्हाला काढावी लागते, जर तुम्ही घरातील सोन्याची हंडी काढली नाही तर तुमच्या घरातील व्यक्तीला काही कमी जास्त होवू शकते अशी धमकी दिली. त्यामुळे धास्तावलेल्या फिर्यादींनी त्यांना घरातील सोन्याची हंडी काढण्याची परवानगी दिली. त्यानंतर दिनांक ०५/०३/२०२५ रोजी किष्णा कन्हैया येधानी व त्याचे सोबत जितेंद्र जिवन राठोड, वय २९ वर्षे, रा.आसोला सावंगी, ता. जि. नागपूर यांनी फिर्यादीचे घरी येवून सोन्याचा हंडा काढण्याकरीता पूजा सामग्री करीता नगदी १,६५,०००/- रूपये घेतले व दिनांक ०६/०३/२०२५ रोजी चे दुपारी ०१.३० वा. फिर्यादीचे घरी आले व त्यांनी त्यांची विधी केली. त्यानंतर फिर्यादी ला आतमध्ये बोलावून हातात एक लाल कपड्यामध्ये हंडा देवून तुम्ही या हंड्याला उघडू नका, नाही तर काही तरी अर्नथ होईल असे, सांगून हंडा घराचे आड्याला बांधून ठेवला. आणखी दोन हंडे काढायचे आहे, हा हंडा काढतांना त्याला सोने चढवावे लागते असे म्हणत आरोपींनी फिर्यादीचे जवळून अकरा ग्रॅमचे सोन्याचे नेक्लेस घेतला व तो मातीच्या गड्यात दान केल्याचे सांगितले. दिनांक ०९/०३/२०२५ रोजी सकाळी ०९.०० वा. फिर्यादी घरी हजर असतांना फिर्यादीचे फोन वर यातील एकाने फोन करून दोन हंडे काढण्याकरीता एक विधी कराव लागते, त्यासाठी तुम्हाला १२,००,०००/- रूपये खर्च करावा लागते असे तक्रारीत म्हटलं आहे. तेव्हा फिर्यादीने त्यांना सांगितले की, ऐवढे पैसे खर्च करू शकत नाही, तेव्हा आरोपीनी फिर्यादी ला भिती दाखविली की, तुमच्या मुलाला व तुमच्या घरच्यांना जिवीतहानी होवू शकते असे म्हणून धमकी दिली. त्यानंतर घाबरलेल्या फिर्यादीने त्यांचा साळा यांना सदर घटना सांगितली असता त्यांनी तुमच्या सोबत फसवणूक झाली आहे असे, कान उघडणी केली. फिर्यादीने त्यांचे घराचे आड्याला बांधून असलेला लाल कपड्यामधील हंडा उघडून पाहीला असता त्यामध्ये तांब्याचा हंडा व त्यामध्ये पितळीच्या धातूच्या मुर्त्या दिसल्या. नंतर फिर्यादीचे घरामध्ये खड्डा करून मातीत गाडलेला ११ ग्रॅम चा सोन्याचा नेकलेस खोदून पाहता असता फिर्यादीला त्यामध्ये मिळून आला नाही. त्यामुळे आपली फसगत झाली असे समजताच फिर्यादीने दोंघांना घरी बोलाविले असता त्यांनी घरी येण्यासाठी टाळाटाळ केली. त्यानंतर फिर्यादीने त्यांना की, "मी तुम्हाला विधीचे खर्च देतो" असे म्हटले असता ठगाने मी तुमच्या घरी येवू शकत नाही. चंद्रपूर, वरोरा किंवा वणी येथे भेटू शकतो, असे म्हटल्यावर फिर्यादीने दिनांक १६/०३/२०२५ रोजी वणी येथे आय टी आय कॉलेज, हयात अॅक्वा जवळ भेटण्याचे ठरविले. रविवार दिनांक १६ मार्च रोजी फिर्यादी व त्याचा साळा आणि त्याचे काही मित्र असे, सदर ठिकाणी थांबून असतांना गुन्ह्यातील आरोपी किष्णा कन्हैया येधानी व जितेंद्र जिवन राठोड, आणि वाहन चालक नामे सुशील राजेश द्विवेदी (वय ३६) रा. तारशी, ता. जि. नागपूर असे चारचाकी इनोवा गाडी क्र.एम एच ४४, बि ००५५ ने तेथे आले. तेव्हा फिर्यादीने आरोपीतांना म्हटले की, तुम्ही आमची फसवणूक करीत आहे. आमचा तुमच्यावर विश्वास नाही. तुम्ही आमचा सोन्याचा नेकलेस आणि पैसे परत द्या. तेव्हा ठगानी फिर्यादीला व त्याच्यासोबत असलेल्या इस्माला शिवीगाळ करून सोन व पैसे परत करत नाही. तुमच्यान जे होते ते करून घ्या अशी धमकी दिली. दरम्यान फिर्यादीने व त्याचे सहकाऱ्यांनी ठगांना पकडले व वणी ठाण्याला फोन करून पोलीसांना बोलाविले व त्यांना पोलीस स्टेशनला घेवून आले. 

फिर्यादीची फसवणूक केली,त्यांचे विरूद्ध कायदेशिर कार्यवाही करीता पोलीस स्टेशनला तक्रार दिली. सदर गुन्ह्याचे तपासात नमूद तिन्ही आरोपीतांना ताब्यात घेवून पो.स्टे. मध्ये आणून अटक करण्यात आली. त्यांचे वर बि एनएस च्या कलम ३१८ (४), ३५२,३५१ (२), ३५१(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपीतांकडून नगदी १,५०,०००/- रूपये, तसेच सोन्याचा नेकलेस वजन ११.३४० ग्रॅम कि. अं ९०,०००/- रूपये आणि एक टोयोटा कंपनीची इनोव्हा गाडी क्र. MH 44 B 0055 कि. अंदाजे ७,००,०००/- रू. असा एकूण ९,४०,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करून न्यायालय वणी येथे हजर करण्यात आले. तिन्ही आरोपीतांना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. 

सदरची कार्यवाही गणेश किंद्रे उपविभागीय पोलीस अधिकारी वणी, गोपाल उंबरकर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वणी यांचे मार्गदर्शनात पोउपनि धिरज गुल्हाने (डि बी पथक प्रमुख), पोका वसीम, पोका गजानन, पोका निरंजन, पोका मोनेश्वर डि.बी. पथक वणी यांनी केली.

विदर्भ बेलदार समाज संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी जयवंतराव वल्लमवार


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

पांढरकवडा : विदर्भ बेलदार तत्सम समाज संघटनेची सभा दि.१६ मार्च रविवार रोजी बचत भवन नगरपरिषद पांढरकवडा येथे संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रांतिय अध्यक्ष चंद्रशेखर कोटेवार, प्रांतीय सदस्य सर्वश्री आनंद अंगलवार,मनिष कन्नमवार,आनंद कार्लेकर,संजय कोटेवार, अरुणाताई कोटेवार व समाज संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक आदेवार साहेब,रजनलवार सर,संजय आकीनवार, पार्लावार काका हे प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते.

प्रदिर्घ देशसेवा केलेले निवृत्त कॅप्टन पाटण चे सुपुत्र नारायण मुत्यालवार,सुभेदार अशोक शेरकुवार यांचा हृदय सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद गांगुलवार यांनी केले. एकसविसाव्या राज्यस्तरीय अधिवेशनाचा अहवाल ॲड.के जी मुत्यालवार यांनी केले. संघटनेच्या पंचविस वर्षात संघटनेच्या कार्याचा अहवाल चंद्रशेखर कोटेवार यांनी सादर केला. त्यानंतर सर्वानुमते जिल्हाअध्यक्ष पदी जयवंतराव भास्करराव वल्लमवार व महिला जिल्हाअध्यक्षपदी सौ.दीपाली संदिप पदलमवार यांची एकमताने निवड करण्यात आली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजेद्र भंडारवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप पद्लमवार. प्रकाश कायपेल्लीवार, नितीन बंतपेल्लीवार, संदिप देशट्टीवार, दीपक आईदलवार, गणेश सुंकरवार, राम चिट्टलवार, अनुप हुस्केवार, अविनाश कोटेवार, अरविंद पडलवार, शेखर अलमवार,शुभम पदलमवार, संदीप गंधेवार, प्रवीण चौलमवार, प्रमोद नेल्लावार, सुनिल चिंतावार,विठ्ठल मदिकुंटवार, सुभाष पार्लावार, आकुलवार, सुंकरवार, निलेश कुर्मावार, सुनिल अंबरवार, गजानन बोमेनवार, विजय लक्षट्टीवार सर,रामेश्वर पुद्दरवार आदिनी अथक परिश्रम घेतले.सभेला शेकडो समाज बांधव व भगिनी उपस्थित होते.