घरातील हंडा काढावं लागतं, 44 वर्षाच्या इसमाला लाखात फसवले

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : घरात सोन्याचा हंडा असल्याचे आमिष दाखवत वणी तालुक्यातील एका व्यक्तीला लाखों रुपये उकळून फसवणूक केल्याप्रकरणी एका ठगासह दोघांना वणी पोलिसांनी अटक केली आहे. 

४४ वर्षांच्या इस्माला गुप्तधन काढावं लागतं, अन्यथा तुमच्यासोबत, तुमच्या कुटुंबातील लोकांसाबात बरंवाईट होईल अशी भीती देऊन त्याच्याकडून महिनाभरात तब्बल १ लाख ६५ हजार रुपये व ११.३४० ग्रॅम सोन्याचा नेकलेस उकळले आहेत. ही घटना तालुक्यातील एका गावात घडली आहे. 

फिर्यादीच्या तक्रारीवरून असे की,फिर्यादीला दोन महिनेपूर्वी सांगितले की, तुमच्या घरामध्ये सोन्याची हंडी आहे, ती तूम्हाला काढावी लागते, जर तुम्ही घरातील सोन्याची हंडी काढली नाही तर तुमच्या घरातील व्यक्तीला काही कमी जास्त होवू शकते अशी धमकी दिली. त्यामुळे धास्तावलेल्या फिर्यादींनी त्यांना घरातील सोन्याची हंडी काढण्याची परवानगी दिली. त्यानंतर दिनांक ०५/०३/२०२५ रोजी किष्णा कन्हैया येधानी व त्याचे सोबत जितेंद्र जिवन राठोड, वय २९ वर्षे, रा.आसोला सावंगी, ता. जि. नागपूर यांनी फिर्यादीचे घरी येवून सोन्याचा हंडा काढण्याकरीता पूजा सामग्री करीता नगदी १,६५,०००/- रूपये घेतले व दिनांक ०६/०३/२०२५ रोजी चे दुपारी ०१.३० वा. फिर्यादीचे घरी आले व त्यांनी त्यांची विधी केली. त्यानंतर फिर्यादी ला आतमध्ये बोलावून हातात एक लाल कपड्यामध्ये हंडा देवून तुम्ही या हंड्याला उघडू नका, नाही तर काही तरी अर्नथ होईल असे, सांगून हंडा घराचे आड्याला बांधून ठेवला. आणखी दोन हंडे काढायचे आहे, हा हंडा काढतांना त्याला सोने चढवावे लागते असे म्हणत आरोपींनी फिर्यादीचे जवळून अकरा ग्रॅमचे सोन्याचे नेक्लेस घेतला व तो मातीच्या गड्यात दान केल्याचे सांगितले. दिनांक ०९/०३/२०२५ रोजी सकाळी ०९.०० वा. फिर्यादी घरी हजर असतांना फिर्यादीचे फोन वर यातील एकाने फोन करून दोन हंडे काढण्याकरीता एक विधी कराव लागते, त्यासाठी तुम्हाला १२,००,०००/- रूपये खर्च करावा लागते असे तक्रारीत म्हटलं आहे. तेव्हा फिर्यादीने त्यांना सांगितले की, ऐवढे पैसे खर्च करू शकत नाही, तेव्हा आरोपीनी फिर्यादी ला भिती दाखविली की, तुमच्या मुलाला व तुमच्या घरच्यांना जिवीतहानी होवू शकते असे म्हणून धमकी दिली. त्यानंतर घाबरलेल्या फिर्यादीने त्यांचा साळा यांना सदर घटना सांगितली असता त्यांनी तुमच्या सोबत फसवणूक झाली आहे असे, कान उघडणी केली. फिर्यादीने त्यांचे घराचे आड्याला बांधून असलेला लाल कपड्यामधील हंडा उघडून पाहीला असता त्यामध्ये तांब्याचा हंडा व त्यामध्ये पितळीच्या धातूच्या मुर्त्या दिसल्या. नंतर फिर्यादीचे घरामध्ये खड्डा करून मातीत गाडलेला ११ ग्रॅम चा सोन्याचा नेकलेस खोदून पाहता असता फिर्यादीला त्यामध्ये मिळून आला नाही. त्यामुळे आपली फसगत झाली असे समजताच फिर्यादीने दोंघांना घरी बोलाविले असता त्यांनी घरी येण्यासाठी टाळाटाळ केली. त्यानंतर फिर्यादीने त्यांना की, "मी तुम्हाला विधीचे खर्च देतो" असे म्हटले असता ठगाने मी तुमच्या घरी येवू शकत नाही. चंद्रपूर, वरोरा किंवा वणी येथे भेटू शकतो, असे म्हटल्यावर फिर्यादीने दिनांक १६/०३/२०२५ रोजी वणी येथे आय टी आय कॉलेज, हयात अॅक्वा जवळ भेटण्याचे ठरविले. रविवार दिनांक १६ मार्च रोजी फिर्यादी व त्याचा साळा आणि त्याचे काही मित्र असे, सदर ठिकाणी थांबून असतांना गुन्ह्यातील आरोपी किष्णा कन्हैया येधानी व जितेंद्र जिवन राठोड, आणि वाहन चालक नामे सुशील राजेश द्विवेदी (वय ३६) रा. तारशी, ता. जि. नागपूर असे चारचाकी इनोवा गाडी क्र.एम एच ४४, बि ००५५ ने तेथे आले. तेव्हा फिर्यादीने आरोपीतांना म्हटले की, तुम्ही आमची फसवणूक करीत आहे. आमचा तुमच्यावर विश्वास नाही. तुम्ही आमचा सोन्याचा नेकलेस आणि पैसे परत द्या. तेव्हा ठगानी फिर्यादीला व त्याच्यासोबत असलेल्या इस्माला शिवीगाळ करून सोन व पैसे परत करत नाही. तुमच्यान जे होते ते करून घ्या अशी धमकी दिली. दरम्यान फिर्यादीने व त्याचे सहकाऱ्यांनी ठगांना पकडले व वणी ठाण्याला फोन करून पोलीसांना बोलाविले व त्यांना पोलीस स्टेशनला घेवून आले. 

फिर्यादीची फसवणूक केली,त्यांचे विरूद्ध कायदेशिर कार्यवाही करीता पोलीस स्टेशनला तक्रार दिली. सदर गुन्ह्याचे तपासात नमूद तिन्ही आरोपीतांना ताब्यात घेवून पो.स्टे. मध्ये आणून अटक करण्यात आली. त्यांचे वर बि एनएस च्या कलम ३१८ (४), ३५२,३५१ (२), ३५१(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपीतांकडून नगदी १,५०,०००/- रूपये, तसेच सोन्याचा नेकलेस वजन ११.३४० ग्रॅम कि. अं ९०,०००/- रूपये आणि एक टोयोटा कंपनीची इनोव्हा गाडी क्र. MH 44 B 0055 कि. अंदाजे ७,००,०००/- रू. असा एकूण ९,४०,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करून न्यायालय वणी येथे हजर करण्यात आले. तिन्ही आरोपीतांना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. 

सदरची कार्यवाही गणेश किंद्रे उपविभागीय पोलीस अधिकारी वणी, गोपाल उंबरकर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वणी यांचे मार्गदर्शनात पोउपनि धिरज गुल्हाने (डि बी पथक प्रमुख), पोका वसीम, पोका गजानन, पोका निरंजन, पोका मोनेश्वर डि.बी. पथक वणी यांनी केली.
घरातील हंडा काढावं लागतं, 44 वर्षाच्या इसमाला लाखात फसवले घरातील हंडा काढावं लागतं, 44 वर्षाच्या इसमाला लाखात फसवले Reviewed by सह्याद्री चौफेर on March 18, 2025 Rating: 5
Powered by Blogger.