कुमार चिंता पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांचेतर्फे यवतमाळकरांना आवाहन व निर्देश

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

यवतमाळ : यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या मार्फतीने यवतमाळ जिल्हयातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, नागपुर शहरात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभुमीवर कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणारे किंवा दोन धर्मामध्ये तेढ पसरविणारे आक्षेपार्ह मॅसेज, इमेजेस, व्हिडीओज घटनेची व माहितीची शहानिशा न करता व्हॉटसअॅप, फेसबुक, व्टिटर, इन्स्टाग्राम व ईतर सोशल मिडीया माध्यमांवर पोस्ट प्रसारीत करु नये. कोणत्याही अफवा पसरवु नये. अशा कोणत्याही पोस्टमुळे दोन व्यक्ती, समाज, धर्म पंथ अशांच्या भावना दुखावुन समाजात तणाव निर्माण होवुन कोणतीही अनुचित घटना घडल्यास सदर पोस्ट करणाऱ्या इसमांस गुन्हा करण्यास प्रवृत्त केल्याचे समजुन त्यावर कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

यवतमाळ जिल्हयात सर्व ठिकाणी चोख बंदोबस्त नेमण्यात आलेला असुन सर्व पोलीस दल सतर्क आहे. तसेच सोशल मिडीया मॉनीटरींग सेल स्थापन करण्यात आला असुन सर्व व्हॉटसअॅप, फेसबुक, व्टिटर, इन्स्टाग्राम व ईतर सोसल मिडीया माध्यमांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. याव्दारे यवतमाळ जिल्हयातील सर्व नागरींकाना निर्देश देण्यात येते की, नागपुर शहरातील झालेल्या घटनेच्या संदर्भाने खोटे मॅसेज व अफवा सोशल मिडीयावर पसरविण्यास तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल करणाऱ्या व संबधीत ग्रुप अॅडमीन यांना जबाबदार धरण्यात येईल असे कृत्य करणाऱ्यास महाराष्ट्र पोलीस कायदा तसेच भारतीय न्याय संहीता प्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, तरी सर्व व्हॉटसअॅप अॅडमीन यांना सुचित करण्यात येते की, आपण सर्वांनी यवतमाळ जिल्हयामध्ये शांतता व सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोलीस दलास सहकार्य करावे.
कुमार चिंता पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांचेतर्फे यवतमाळकरांना आवाहन व निर्देश कुमार चिंता पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांचेतर्फे यवतमाळकरांना आवाहन व निर्देश Reviewed by सह्याद्री चौफेर on March 18, 2025 Rating: 5
Powered by Blogger.