सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
यवतमाळ : जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना व शासकीय कामाकरिता रेती उपलब्ध करून द्यावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुकाराम माथनकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
यवतमाळ जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रमाई, शबरी, आदीम, मोदी आवास व पंतप्रधान आवास योजना मंजूर झाल्या असून रेती अभावी घरकूल योजनेचे सर्व कामे व ग्राम पंचायत स्तरावरील शासकीय विकासात्मक कामे रखडलेले आहे. यवतमाळ जिल्हा विभागामध्ये १६ तालूके असून प्रत्येक तालूक्यामध्ये २ रेती घाट घरकूल योजना व ग्राम पंचायत अंतर्गत शाककीय विकासात्मक कामाकरीता राखीव देण्यात यावे. याआधी सरपंच संघटनेच्या वतिने दिनांक ११ फेब्रुवारी २०२५ ला निवेदन देण्यात आले होते,मात्र यवतमाळ जिल्ह्यातील रेती घाट अद्याप सूरू करण्यात आलेले नाही. १५ दिवसाच्या आत रेती घाट सूरू न केल्यास महाराष्ट्र प्रदेश संघटना यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने तिर्व आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी जिल्हा अध्यक्ष तुकाराम माथनकर, सौ सविता जाधव जिल्हा महामंत्री, निलेश पिंपळकर यवतमाळ तालुका अध्यक्ष उमेश राठोड, प्रमोद नाटकर व जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना व शासकीय कामाकरिता रेती उपलब्ध करून द्या - सरपंच संघटनेची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 18, 2025
Rating: