वनपट्टेधारकांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ द्या


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : तालुक्यातील मोहदा येथील 25 वनजमिन धारकांना मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्यात आले, परंतु शासनाच्या विविध योजनेपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप निवेदनातून केला. 

पंतप्रधान पीक विमा योजना, किसान सन्मान निधी, नमो शेतकरी महासन्मान योजना कापूस सोयाबीन अर्थ सहाय्य योजना अश्या विविध योजनेपासून वन जमीन पट्टे धारकांना वंचित राहावे लागत असल्यामुळे मोहदा येथील भगवान खुशाल कुमरे यांनी लोकशाही दिनात जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे.

मोहदा ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच यांनी केला होता पाठपुरावा :
मोहदा ग्रामपंचायतचे सरपंच वर्षा राजूरकर व उपसरपंच सचिन रासेकर यांच्या पाठपुराव्यामुळे 25 शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने वनहक्क पट्टे बहाल करण्यात आले. या शेतजमिनीवर अंशतः या वनपट्टेधारकांना अधिकार प्राप्त झाला. परंतु इतर शेतकऱ्यांप्रमाणे यांना अतिवृष्टी, पिक विमा, कीड व रोगामुळे झालेल्या हानीची नुकसानभरपाई मिळण्यास प्रशासनाकडून सहकार्य मिळत नाहीत. लोकशाही दिनात जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे. वनहक्क पट्टेधारक कास्तकारांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी जोर धरत आहे.


मारेगावात लाभार्थी सन्मान यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : येथील नगर पंचायत च्या प्रांगणात लाभार्थी सन्मान यात्रेचे आयोजन दि. 7 ऑक्टोबर ला सकाळी 11 वाजता भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा क्षेत्र, यांच्या वतीने करण्यात आले होते. या यात्रेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाले.

या आयोजित सन्मान यात्रेला वणी विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी भेट देऊन यात्रेतील बहिणींची विचारपूस केली. व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. सर्वांनी सहभागी होऊन आपली प्रतिक्रिया लिखित द्याव्यात, ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांनाही मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार असल्याचं ते म्हणाले. केवायसी, आधार अपडेट्स करून घ्यावे,असे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांनी सहभागी झालेल्या लाडक्या बहिणींना सांगितले. 

या वेळी मारेगाव तालुका संयोजक नितीन रासेकर, अध्यक्ष अविनाश लांबट, माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, ता. सरचिटणीस प्रशांत नांदे, नगरसेवक राहुल राठोड, महिला अध्यक्ष शालिनीताई दारुंडे यांचे सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

राज्यात "लाभार्थी सन्मान यात्रा" राबविण्यात येत असताना मारेगाव तालुक्यातील सर्वाधिक महिलांनी उपस्थिती दर्शवून यात्रेमध्ये जवळजवळ 1 हजार 350 देवा भाऊंच्या बहिणींनी सहभाग नोंदवला. आतापर्यंतच्या संपन्न झालेल्या यात्रेची ही सर्वात मोठी उपलब्धी असल्याचे आयोजकांनी सांगितले. या कार्यक्रमाला यशस्वीकरण्यासाठी शहराध्यक्ष अनुप महाकुलकर, सरचिटणीस गणेश झाडे, ता. उपाध्यक्ष सुनील देऊळकर, गणपती वऱ्हाटे, सूर्यभान ठोबरे, लीलाधर काळे, आशिष खंडाळकर, चंद्रकांत धोबे, दादाराव ठोबरे, गणेश खुसपुरे, सुमित जुनघरी, प्रवीण बोथले, विनोद बोढे, अशोक देऊळकर, आदींनी अथक परिश्रम घेतले.

ठाणेदार संजय सोळंखे यांनी साधला पत्रकारांशी संवाद


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : पोलीस समाजाच्या रक्षणासाठी काय काय करते, याची माहिती पत्रकारांच्या माध्यमातून समाजापर्यंत जात असते. वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक मिडीया व न्यूज पोर्टल हे अतिशय प्रभावी माध्यम मानले जाते. पोलीस आणि समाजातील अंतर कमी करण्यासाठी पत्रकार हा महत्वाची भूमिका बजावत असतो,सध्या राज्यात नवरात्री उत्सव सुरू आहे. याच अनुषंगाने मारेगाव पोलीस स्टेशन चे नुकतेच पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक संजय सोळंखे यांनी आज (ता. 7) एक बैठक बोलावून तालुक्यातील पत्रकार बांधवांशी संवाद साधला. 

सध्या नवरात्री उत्सव सुरू असून मोठ्या धुमधामात सर्वत्र धार्मिक वातावरण आहेत. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवानिमित्त शहर व ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा, यासाठी पत्रकार बांधवानी आपल्या विविध माध्यमातून सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करित ठाणेदार श्री. सोळंखे यांनी यावेळी मारेगाव पोलीस स्टेशन चा पदभार स्वीकारल्यानंतर आपला उपस्थितांना परिचय दिला. बैठकित पत्रकारांच्या काही सुचना प्रामुख्याने नमूद केल्या, त्याचे निराकरण करण्यात येइल अशी त्यांनी यावेळी ग्वाही दिली. ही मारेगाव पोलीस स्टेशन च्या इतिहासातील पहिलीच पोलीस आणि पत्रकार बैठक असल्याची मानली जात आहे.

उपस्थित सर्व पत्रकार संघटनेच्या पत्रकार बांधवांचा त्यांच्या माध्यमासह परिचय करून आभार व्यक्त केला. शेवटी विविध संघटनेच्या पत्रकार बांधवानी नुकतेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक संजय सोळंखे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व उपस्थित सर्वांनी नमस्कार घेतला.

आज वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : वणी तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडी वणी शाखेच्या वतीने 7 ऑक्टोंबर 2024 रोजी वीज वितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे. 

शहरात सध्या विज वितरण कंपनीचा मनमानी कारभार सुरू असून यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 

शहरी असो की ग्रामीण भाग,विज पुरवठा खंडित झाल्यास विज वितरण कार्यालयाला संपर्क करणे फार अवघड असून त्यांचा फोन सतत बंद स्थितीत असतो. सायंकाळी सहानंतर तर कुठलीही तक्रार स्वीकारण्यात येत नाही. विजेच्या लपंडावामुळे याचा सामान्य ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीने वीज वितरण कंपनीला निवेदन सुद्धा देण्यात आले होते. परंतु अद्याप पावतो त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई कंपनीकडून करण्यात आली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव संबंधित विभागाच्या विरोधात आज धरणे आंदोलन करण्यात येत आहे. 
 
तालुक्यातील वीज ग्राहक तर त्रस्त आहेतच मात्र, शेतकऱ्यांसाठी विज ही समस्या खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यामुळेच धरणे देत असल्याचे वंचितचे तालुका अध्यक्ष हरिष पाते यांनी सांगितले आहे.

बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वणी विधानसभा अध्यक्ष पदी महेश आत्राम

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : दलीत आदिवासी भूमिहीन बेघर ओबीसी गरीब मराठा तथा सातबारा नावावर नसलेल्या लोकांच्या न्याय हक्कासाठी संविधनात्मक मार्गाने संघर्ष करणारी आशिया खंडातील पहिली क्रांतिकारी संघटना आणि त्या संघटनेचे प्रणेते भाई जगदिश कुमार इंगळे यांच्या आदेशप्रमाणे वणी येथील युवा नेतृत्व महेश अत्राम यांची वणी विधानसभा अध्यक्ष पदावर बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय कार्य अध्यक्ष डॉ. सुखदेव कांबळे यांनी नियुक्ती पत्र देऊन सन्मान केला. 

शामा दादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा तथा बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या महिला अध्यक्षा सौ. इंदिरा बोंदरे, समशेर सिंग भोसले फासे पारधी संघटनेचे विलास पवार यांनी महेश अत्राम यांना भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या कार्य पद्धतीवर अभ्यास करुन संघटनेचे प्रणेते भाई जगदिश कुमार इंगळे यांच्या सनदशिर व संविधनात्मक पद्धतीने सुरू असलेले कार्य गतिमान करण्यासाठी मी संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कार्य करणार असुन मला बिगर सातबारा शेतकरी संघटनेत भाई जगदिश कुमार इंगळे यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली, निश्चित स्वरूपात संधीच सोन करुन लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणार असल्याची प्रतिक्रिया महेश अत्राम यांनी दिली.