ठाणेदार संजय सोळंखे यांनी साधला पत्रकारांशी संवाद


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : पोलीस समाजाच्या रक्षणासाठी काय काय करते, याची माहिती पत्रकारांच्या माध्यमातून समाजापर्यंत जात असते. वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक मिडीया व न्यूज पोर्टल हे अतिशय प्रभावी माध्यम मानले जाते. पोलीस आणि समाजातील अंतर कमी करण्यासाठी पत्रकार हा महत्वाची भूमिका बजावत असतो,सध्या राज्यात नवरात्री उत्सव सुरू आहे. याच अनुषंगाने मारेगाव पोलीस स्टेशन चे नुकतेच पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक संजय सोळंखे यांनी आज (ता. 7) एक बैठक बोलावून तालुक्यातील पत्रकार बांधवांशी संवाद साधला. 

सध्या नवरात्री उत्सव सुरू असून मोठ्या धुमधामात सर्वत्र धार्मिक वातावरण आहेत. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवानिमित्त शहर व ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा, यासाठी पत्रकार बांधवानी आपल्या विविध माध्यमातून सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करित ठाणेदार श्री. सोळंखे यांनी यावेळी मारेगाव पोलीस स्टेशन चा पदभार स्वीकारल्यानंतर आपला उपस्थितांना परिचय दिला. बैठकित पत्रकारांच्या काही सुचना प्रामुख्याने नमूद केल्या, त्याचे निराकरण करण्यात येइल अशी त्यांनी यावेळी ग्वाही दिली. ही मारेगाव पोलीस स्टेशन च्या इतिहासातील पहिलीच पोलीस आणि पत्रकार बैठक असल्याची मानली जात आहे.

उपस्थित सर्व पत्रकार संघटनेच्या पत्रकार बांधवांचा त्यांच्या माध्यमासह परिचय करून आभार व्यक्त केला. शेवटी विविध संघटनेच्या पत्रकार बांधवानी नुकतेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक संजय सोळंखे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व उपस्थित सर्वांनी नमस्कार घेतला.
ठाणेदार संजय सोळंखे यांनी साधला पत्रकारांशी संवाद ठाणेदार संजय सोळंखे यांनी साधला पत्रकारांशी संवाद Reviewed by सह्याद्री चौफेर on October 07, 2024 Rating: 5
Powered by Blogger.