सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : वणी तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडी वणी शाखेच्या वतीने 7 ऑक्टोंबर 2024 रोजी वीज वितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
शहरात सध्या विज वितरण कंपनीचा मनमानी कारभार सुरू असून यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
शहरी असो की ग्रामीण भाग,विज पुरवठा खंडित झाल्यास विज वितरण कार्यालयाला संपर्क करणे फार अवघड असून त्यांचा फोन सतत बंद स्थितीत असतो. सायंकाळी सहानंतर तर कुठलीही तक्रार स्वीकारण्यात येत नाही. विजेच्या लपंडावामुळे याचा सामान्य ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीने वीज वितरण कंपनीला निवेदन सुद्धा देण्यात आले होते. परंतु अद्याप पावतो त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई कंपनीकडून करण्यात आली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव संबंधित विभागाच्या विरोधात आज धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
तालुक्यातील वीज ग्राहक तर त्रस्त आहेतच मात्र, शेतकऱ्यांसाठी विज ही समस्या खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यामुळेच धरणे देत असल्याचे वंचितचे तालुका अध्यक्ष हरिष पाते यांनी सांगितले आहे.
आज वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 07, 2024
Rating: