मारेगावात लाभार्थी सन्मान यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : येथील नगर पंचायत च्या प्रांगणात लाभार्थी सन्मान यात्रेचे आयोजन दि. 7 ऑक्टोबर ला सकाळी 11 वाजता भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा क्षेत्र, यांच्या वतीने करण्यात आले होते. या यात्रेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाले.

या आयोजित सन्मान यात्रेला वणी विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी भेट देऊन यात्रेतील बहिणींची विचारपूस केली. व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. सर्वांनी सहभागी होऊन आपली प्रतिक्रिया लिखित द्याव्यात, ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांनाही मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार असल्याचं ते म्हणाले. केवायसी, आधार अपडेट्स करून घ्यावे,असे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांनी सहभागी झालेल्या लाडक्या बहिणींना सांगितले. 

या वेळी मारेगाव तालुका संयोजक नितीन रासेकर, अध्यक्ष अविनाश लांबट, माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, ता. सरचिटणीस प्रशांत नांदे, नगरसेवक राहुल राठोड, महिला अध्यक्ष शालिनीताई दारुंडे यांचे सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

राज्यात "लाभार्थी सन्मान यात्रा" राबविण्यात येत असताना मारेगाव तालुक्यातील सर्वाधिक महिलांनी उपस्थिती दर्शवून यात्रेमध्ये जवळजवळ 1 हजार 350 देवा भाऊंच्या बहिणींनी सहभाग नोंदवला. आतापर्यंतच्या संपन्न झालेल्या यात्रेची ही सर्वात मोठी उपलब्धी असल्याचे आयोजकांनी सांगितले. या कार्यक्रमाला यशस्वीकरण्यासाठी शहराध्यक्ष अनुप महाकुलकर, सरचिटणीस गणेश झाडे, ता. उपाध्यक्ष सुनील देऊळकर, गणपती वऱ्हाटे, सूर्यभान ठोबरे, लीलाधर काळे, आशिष खंडाळकर, चंद्रकांत धोबे, दादाराव ठोबरे, गणेश खुसपुरे, सुमित जुनघरी, प्रवीण बोथले, विनोद बोढे, अशोक देऊळकर, आदींनी अथक परिश्रम घेतले.
मारेगावात लाभार्थी सन्मान यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मारेगावात लाभार्थी सन्मान यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद Reviewed by सह्याद्री चौफेर on October 08, 2024 Rating: 5
Powered by Blogger.