वनपट्टेधारकांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ द्या


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : तालुक्यातील मोहदा येथील 25 वनजमिन धारकांना मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्यात आले, परंतु शासनाच्या विविध योजनेपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप निवेदनातून केला. 

पंतप्रधान पीक विमा योजना, किसान सन्मान निधी, नमो शेतकरी महासन्मान योजना कापूस सोयाबीन अर्थ सहाय्य योजना अश्या विविध योजनेपासून वन जमीन पट्टे धारकांना वंचित राहावे लागत असल्यामुळे मोहदा येथील भगवान खुशाल कुमरे यांनी लोकशाही दिनात जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे.

मोहदा ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच यांनी केला होता पाठपुरावा :
मोहदा ग्रामपंचायतचे सरपंच वर्षा राजूरकर व उपसरपंच सचिन रासेकर यांच्या पाठपुराव्यामुळे 25 शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने वनहक्क पट्टे बहाल करण्यात आले. या शेतजमिनीवर अंशतः या वनपट्टेधारकांना अधिकार प्राप्त झाला. परंतु इतर शेतकऱ्यांप्रमाणे यांना अतिवृष्टी, पिक विमा, कीड व रोगामुळे झालेल्या हानीची नुकसानभरपाई मिळण्यास प्रशासनाकडून सहकार्य मिळत नाहीत. लोकशाही दिनात जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे. वनहक्क पट्टेधारक कास्तकारांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी जोर धरत आहे.


वनपट्टेधारकांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ द्या वनपट्टेधारकांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ द्या Reviewed by सह्याद्री चौफेर on October 08, 2024 Rating: 5
Powered by Blogger.