सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वर्धा : दि. 5 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय ओबीसी महासंघ सवांद सभा येथील संताजी सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आली होती. जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनात हिंगणघाट तालुका कार्यकारणी घोषित करण्यात आली.
या कार्यकारणीच्या तालुका अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्त्या मंगला ठक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर, सचिव भावराव कोटकर, सहसचिव भाऊ नक्षिने यांना नियुक्ती दिली. ओबीसी महासंघ सभेचे महासचिव सचिन राजूरकर यांचे हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच युवा आघाडीच्या तालुका अध्यक्ष पदी शुभम जाधव यांची देखील निवड केली. दरम्यान, सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे ओबीसी महासंघाच्या वतीने त्यांचे स्वागत केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रवीण पेठे, सुधीर पांगुळ व बहुसंख्येने ओबीसी नेते उपस्थित होते.
ओबीसी महासंघाच्या तालुका अध्यक्ष पदी मंगला ठक यांची नियुक्ती
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 08, 2024
Rating: