जीवेत शरद शतम् विजयबाबू...वाढदिवसाच्या लाख... लाख शुभेच्छा!

म्हणून तुम्ही शतायुषी व्हा!

ग्रामीण भागाच्या भल्यासाठी शहरांच्या सुधारणेसाठी 
वणी विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी 
अठरा पगड जातीं-धर्माच्या प्रगतीसाठी 
उन्हात राबणा-यांना सावली देण्यासाठी आया-बहिणींच्या अन दीन-दुबळ्यांच्या आधारासाठी 
वडीलकीच्या नात्याने बेरोजगारांना वाट दाखवण्यासाठी  
सर्वसामान्य गोरगरीब जनता, कष्टकऱ्यांसाठी 
चिखल तुडवत बांधावर जाऊन बळीराजाला सावरण्यासाठी  
वणी विधानसभा मतदार संघाचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी आदरणीय विजयबाबू तुम्ही शतायुषी व्हा! 
बाबू साहेब तुम्ही शतायुषी व्हा! तुम्ही शतायुषी व्हा ! 
तुम्ही शतायुषी व्हा!

विजयबाबू वाढदिवसाच्या लाख... लाख शुभेच्छा!

शुभेच्छुक :
विजयबाबू चोरडिया मित्र परिवार 
वणी विधानसभा,क्षेत्र 

किन्हाळा येथे तान्हा पोळा उत्सहात साजरा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा पोळा सण.त्याच सोबत बडग्याच्या दिवशी 'तान्हा पोळा' हा मोठ्या थाटामाटात साजरा करण्याची एरवी परंपरा आहेत. 
त्यानिमित्त तालुक्यातील किन्हाळा येथे युवक मंडळाच्या वतीने गावातील बाल गोपालांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्दात उद्देशाने तान्हा पोळा ह्या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,येथील बाल मंडळींनी मोठ्या उत्सहाने तान्हा पोळ्यात आपापल्या लाकडी बैलांना सजावट करून या उत्सवात सहभागी झाले. 
दरम्यान गावातील महिला पुरुष तसेच तरुणांनी बाल मंडळीच्या कलेला गुणांना प्रोत्साहन देत त्यांचे भरभरून कौतुक केले. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या तर्फे शेकडो महिलांना साड्या वाटप

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : वणी विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष आमदार संजिवरेड्डी बोदकूरवार यांच्या पुढाकारातून रक्षाबंधन उत्सव निमित्त तालुक्यातील जानकाई (पोड) येथे शेकडो महिलांना साडया व नऊवारी लुघडे वाटप करण्यात आले. हा स्तुत्य उपक्रम अनुलोम-अनुगामी लोकराज्य महाभियान भाग वणी तर्फे 31 ऑगस्ट रोजी घेण्यात आला होता. 
यावेळी भाग समन्वयक वैभव मेहता, भाग जनसेवक वैभव सुर, विस्तारक गुलाब आत्राम, वस्ती मित्र धनराज दादा खंडारे, संवादनी दीपाताई धानोरकर, स्नेहलताई पोतले यासह गावातील महिला मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती.

वणी वाहतूक शाखेने रात्री 13 अवजड वाहनावर ठोकला चालान

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : नांदेपेरा ते वणी 317 हा राज्य महामार्ग कमी वाहतूक क्षमतेचा असल्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सदर रस्ता जड वाहतूकीस बंद ठेण्यात आला आहे. परिणामी या मार्गांवरील नागरिकांनी जड वाहतूक कायम "बंद करा" यासाठी मोठे आंदोलन केले होते. 

त्यामुळे नांदेपेरा ते वणी मार्गे अवजड वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात आली असतांना अधून मधून जड वाहतूक होतांना दिसत आहे, परंतु या बारीकसारीक गोष्टी कडे परिसरातील नागरिकांनी दुर्लक्ष केले होते. तसेच या मार्गांवर प्रशासनाचे कायम दुर्लक्ष होत असते. मात्र, बऱ्याच कालावधी आणि एक वर्षांनंतर काल पोळा सणाच्या दिवशी अचानक मोठ्या प्रमाणात जड वाहतूक रात्रीच्या सुमारास नांदेपेरा ते वणी या मार्गांवर धावत होती, एवढ्या मोठ्या संख्येने वाहतूक आणि तेही जड वाहने चालत असल्याचे पाहुण संतापलेल्या ग्रामस्थांनी वांजरी मार्गांवर ही जड भरधाव वाहने रोखली.
या संदर्भात वणी वाहतूक विभाग शाखेला अवगत करून सदर वाहनावर कारवाई करण्यास भाग पाडले. यावेळी एकूण 13 जड वाहनावर दंडात्मक (चालान) ठोकण्यात आला आहे. ही सर्व जड वाहने कोळसा व अन्य वाहतूक करणारे असून वाहतूक एकोना खदानमधून वनोजा, माढेळी, कोसारा, खैरी, मार्डी, नांदेपेरा, वणी, वरुन चंद्रपूर कडे जाणारी होती असे समजते. त्यानंतरही कारवाईच्या धास्तीने अनेक वाहने नांदेपेरा, वनोजा देवी मार्गांवर रात्री उभी ठाकली होती. याबाबत वाहनचलाकास आमच्या प्रतिनिधीने संवाद साधल्यावर त्यांनी सांगितले की, सणामुळे जागोजागी रस्ता बंद, आणि पाऊसाने अनेक मार्ग रखडल्याने या नांदेपेरा वणी मार्गाने यावे लागले असेही ते म्हणाले. यावेळी वाहतूक विभागा शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा या मार्गाने यायचे नाही अशी तंबी दिली.

पणमात्र, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उलंघन होताना दिसत असल्याचे यावेळी अनेकांनी भावना व्यक्त करत रात्रीच्या दरम्यान,होणारी अवजड वाहतूक परत एखाद्याचा जीव घेईल याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलल्या जात आहे. 

 

आज वणीत तान्हा पोळ्याचे आयोजन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : येथील समाजसेवी विजय चोरडिया यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने आज ३ सप्टेंबर रोजी शहरातील नांदेपेरा रोड नगर परिषद शाळा क्र. ५ जवळ, तान्हा पोळा आयोजित करण्यात आला आहे. 

विशेष म्हणजे,या प्रसंगी बक्षीसांचा पाऊस पडणार असल्याचे तान्हा पोळा उत्सव समिती कडून म्हटलं जात आहे. यात भव्य "लकी ड्रॉ", प्रोत्साहन पर बक्षीस,टिफिन बॉक्स,असे असून एकूण पाच बक्षीसांचा भरघोस समावेश आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात विभागली गेली आहे.यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकांना उत्कृष्ट बक्षीस देण्यात येणार आहे. 

त्यामुळे मंगळवारी सायंकाळी ४.३० वा. होणाऱ्या तान्हा पोळा उत्सवामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे, आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.