आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या तर्फे शेकडो महिलांना साड्या वाटप

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : वणी विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष आमदार संजिवरेड्डी बोदकूरवार यांच्या पुढाकारातून रक्षाबंधन उत्सव निमित्त तालुक्यातील जानकाई (पोड) येथे शेकडो महिलांना साडया व नऊवारी लुघडे वाटप करण्यात आले. हा स्तुत्य उपक्रम अनुलोम-अनुगामी लोकराज्य महाभियान भाग वणी तर्फे 31 ऑगस्ट रोजी घेण्यात आला होता. 
यावेळी भाग समन्वयक वैभव मेहता, भाग जनसेवक वैभव सुर, विस्तारक गुलाब आत्राम, वस्ती मित्र धनराज दादा खंडारे, संवादनी दीपाताई धानोरकर, स्नेहलताई पोतले यासह गावातील महिला मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती.
आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या तर्फे शेकडो महिलांना साड्या वाटप आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या तर्फे शेकडो महिलांना साड्या वाटप Reviewed by सह्याद्री चौफेर on September 03, 2024 Rating: 5
Powered by Blogger.