सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा पोळा सण.त्याच सोबत बडग्याच्या दिवशी 'तान्हा पोळा' हा मोठ्या थाटामाटात साजरा करण्याची एरवी परंपरा आहेत.
त्यानिमित्त तालुक्यातील किन्हाळा येथे युवक मंडळाच्या वतीने गावातील बाल गोपालांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्दात उद्देशाने तान्हा पोळा ह्या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,येथील बाल मंडळींनी मोठ्या उत्सहाने तान्हा पोळ्यात आपापल्या लाकडी बैलांना सजावट करून या उत्सवात सहभागी झाले.
दरम्यान गावातील महिला पुरुष तसेच तरुणांनी बाल मंडळीच्या कलेला गुणांना प्रोत्साहन देत त्यांचे भरभरून कौतुक केले. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किन्हाळा येथे तान्हा पोळा उत्सहात साजरा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 03, 2024
Rating: