वणी वाहतूक शाखेने रात्री 13 अवजड वाहनावर ठोकला चालान

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : नांदेपेरा ते वणी 317 हा राज्य महामार्ग कमी वाहतूक क्षमतेचा असल्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सदर रस्ता जड वाहतूकीस बंद ठेण्यात आला आहे. परिणामी या मार्गांवरील नागरिकांनी जड वाहतूक कायम "बंद करा" यासाठी मोठे आंदोलन केले होते. 

त्यामुळे नांदेपेरा ते वणी मार्गे अवजड वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात आली असतांना अधून मधून जड वाहतूक होतांना दिसत आहे, परंतु या बारीकसारीक गोष्टी कडे परिसरातील नागरिकांनी दुर्लक्ष केले होते. तसेच या मार्गांवर प्रशासनाचे कायम दुर्लक्ष होत असते. मात्र, बऱ्याच कालावधी आणि एक वर्षांनंतर काल पोळा सणाच्या दिवशी अचानक मोठ्या प्रमाणात जड वाहतूक रात्रीच्या सुमारास नांदेपेरा ते वणी या मार्गांवर धावत होती, एवढ्या मोठ्या संख्येने वाहतूक आणि तेही जड वाहने चालत असल्याचे पाहुण संतापलेल्या ग्रामस्थांनी वांजरी मार्गांवर ही जड भरधाव वाहने रोखली.
या संदर्भात वणी वाहतूक विभाग शाखेला अवगत करून सदर वाहनावर कारवाई करण्यास भाग पाडले. यावेळी एकूण 13 जड वाहनावर दंडात्मक (चालान) ठोकण्यात आला आहे. ही सर्व जड वाहने कोळसा व अन्य वाहतूक करणारे असून वाहतूक एकोना खदानमधून वनोजा, माढेळी, कोसारा, खैरी, मार्डी, नांदेपेरा, वणी, वरुन चंद्रपूर कडे जाणारी होती असे समजते. त्यानंतरही कारवाईच्या धास्तीने अनेक वाहने नांदेपेरा, वनोजा देवी मार्गांवर रात्री उभी ठाकली होती. याबाबत वाहनचलाकास आमच्या प्रतिनिधीने संवाद साधल्यावर त्यांनी सांगितले की, सणामुळे जागोजागी रस्ता बंद, आणि पाऊसाने अनेक मार्ग रखडल्याने या नांदेपेरा वणी मार्गाने यावे लागले असेही ते म्हणाले. यावेळी वाहतूक विभागा शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा या मार्गाने यायचे नाही अशी तंबी दिली.

पणमात्र, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उलंघन होताना दिसत असल्याचे यावेळी अनेकांनी भावना व्यक्त करत रात्रीच्या दरम्यान,होणारी अवजड वाहतूक परत एखाद्याचा जीव घेईल याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलल्या जात आहे. 

 
वणी वाहतूक शाखेने रात्री 13 अवजड वाहनावर ठोकला चालान वणी वाहतूक शाखेने रात्री 13 अवजड वाहनावर ठोकला चालान Reviewed by सह्याद्री चौफेर on September 03, 2024 Rating: 5
Powered by Blogger.