मा.आ.श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे वाढदिवसानिमित्त ग्रामीण भागातील शाळेतील 1 ते 7 वर्गातील विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप व निराधार आशा वर्कर महिलांना साडी भेट

सह्याद्री चौफेर | न्यूज 

चंद्रपूर : महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री मा. आ.श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून श्री अनिल डोंगरे प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र यांच्या माध्यमातून सेवाभावी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामधील ग्रामीण भागातील भटाळी,पायली,चिचोली,वडोली,छोटा नागपूर,मोरवा,जुनी पडोली,यशवंत नगर,पडोली फाटा,लखमापूर चांदसूर्ला, विचोडा इत्यादी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पहिली ते सातवी वर्गातील विद्यार्थ्यांना दोन ते तीन नोटबुक याप्रमाणे वाटप करण्यात आले. तसेच गरीब निराधार महिला अशा वर्कर महिला यांना मा. सुधीर भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त साडी भेट देण्यात आले.
या कार्यक्रमाला सो.शोभाताई पिदुरकर जिल्हा उपाध्यक्ष भाजपा महिला आघाडी, श्री सुभाष गौरकर, सौ दुर्गा बावणे तालुका महामंत्री भाजपा महिला आघाडी, सौ.अनिता भोयर तालुका अध्यक्ष महिला आघाडी, श्री. अजय चालेकर, श्री.विजय माशिरकर, श्री.विनोद खडसे, श्री.विक्की लाडसे सरपंच, श्री.राकेश गौरकार सरपंच, श्री निशू पिसे, श्री.राजेश कुबेर,
सौ.माधुरी सागौरे सरपंच, सौ कल्पना गुन्हे, सौ.संगीता हेलवडे, सौ. छायाताई उईके, सौ.प्रतिभा पत्रकार, सौ.सुनिता पिंपलकर, सौ.अंनु ठेंगणे, सौ.कांता खोबरागडे, श्री.शंकर खांडारकर, श्री.अशोक पटेल, श्री.महादेव पिदुरकार, श्री.नानाजी थेरे, श्री.अर्जुन नागरकार., श्री.सुदर्शन निषाद, श्री. विठ्ठल थेरे, यांची उपस्थिती होती.

एस. पी. एम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी


चंदू राऊत | सह्याद्री चौफेर 

वणी : शि. प्र. मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठी जयंती साजरी करण्यात आली.

 यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री क्षीरसागर सर व उपमुख्याध्यापक श्री तामगाडगे सर उपस्थित होते. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी वंदे मातरम हे गीत सादर केले. घोडमारे सर, मेश्राम मॅडम यांनी मुलांना मार्गदर्शन केले,


कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण बुजोने सर यांनी केले तर अध्यक्षीय भाषणात तामगाडगे सर यांनी टिळकांच्या व अण्णा भाऊ साठेच्या जीवनावर प्रकाश टाकला.

 विद्यार्थी दशेत जिद्द चिकाटी मेहनत यांचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले सूत्रसंचालन बुजोने सर यांनी केले तर आभार आस्कर सर यांनी मानले.

बांबू रोप वाटपासह अनेक उपक्रमांनी मुनगंटीवार यांचा वाढ दिवस साजरा

उमेश गोलेपल्लीवार | सह्याद्री चौफेर 

चंद्रपूर : आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे बांबू प्रेम जगजाहीर आहे. त्यांच्या स्वप्नातील हरित चंद्रपूर साकार होण्याची प्रेरणा मिळावी म्हणुन भाजप विधी प्रकोष्ठ ने बांबूची रोपे वाटून त्याचे महत्त्व सांगण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम रविवारी घेतला. 

विधी प्रकोष्ठ चे जिल्हाध्यक्ष ऍड. हरीश मंचलवार यांच्या संकल्पनेतून मुनगंटीवार यांच्या वाढ दिवसाचे औचित्य साधून ईतर अनेक उपक्रम सुद्धा यशस्वीरित्या संपन्न झाले. यात छत्री व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम सचिन कोतपेल्‍लीवार अध्यक्ष बाजार मंडळ भाजपा महानगर, सूर्यकांत कुचनवार सचिव बाजार मंडळ भाजपा, रवी लोणकर अध्यक्ष मंडळ, सौ खुशबू अंकुश चौधरी माजी झोन सभापती, ॲड. किरण पाल महामंत्री विधी प्रकोष्ठ, ॲड. श्रीकांत कवटलवार महामंत्री विधी प्रकोष्ट, सौ रेणुका घोडेस्वार उपाध्यक्ष महिला मोर्चा,ॲड. योगेश पचरे, येल्ले यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. दरम्यान रवी जी घरोटे, विठ्ठलराव मूळपल्लीवार, वामनराव आमटे, नंदकिशोर लिंगलवार यांचे विशेष स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.हरीश मंचलवार जिल्हाध्यक्ष विधी प्रकोष्ठ चंद्रपूर महानगर यांनी केले. संचालन गणेश रासपायले अध्यक्ष काळाराम क्रीडा प्रसारक मंडळ यांनी केलें. भाजपा विधी प्रकोष्ठ व पठाणपुरा वार्ड,दादमहाल वार्ड, समाधी वार्ड मित्रपरिवार यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजीत या उपक्रमात 300 ते 400 लोकांनी सहभाग दर्शविला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश रासयले, सचिन कथलकर, शेखर चीलपवार, पवन रासेकर, योगेश चहारे, अक्षय पाचपोर, सुनील बोभाटे, मंगल शेडमाके, सुनील चांदेकर, विजय डोमलवार, गणेश मंचलवार, अरुण गड्डमवार, संजय रोहनकर, भारत चव्हाण, डुग्गु चहारे, सनाथ ताटकंटीवार यांनी अथक परिश्रम घेतले.

ॲड.हरीश मंचलवार यांनी पर्यावरण, बांबूच्या झाडा संबंधी माहिती दिली, शिक्षणाचे महत्त्व, सांगितले.

राज्यपालांच्या "वादग्रस्त" वक्तव्याचा युवासेनेकडून निषेध

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. मधल्या काळात तर ते आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चांगलेच अडचणीत आल्याचं पाहायला मिळालं होतं. शुक्रवारीदेखील त्यांनी अशाच प्रकारचं अडचणीत आणणारं वक्तव्य करुन स्वतःची सोबतच भाजपची देखील चांगलीच गोची केल्याचं पाहिला मिळालं.
गुजराती, राजस्थानी गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य कोश्यारी यांनी केले. त्यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधारी, विरोधकांसह राज्यातील सर्वसामान्यांनी खडे बोल सुनावले. कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर वणी विधानसभा मध्ये त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा आज (ता.31 जुलै ) ला जोरदार निषेध करण्यात आला.
हिंदूंमध्ये फूट पाडणाऱ्या आणि मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या राज्यपालांचा निषेध व्यक्त करण्यात आला, केंद्राने त्यांना परत बोलवून घ्यावे याकरिता आज रविवार रोजी वणी विधानसभा युवासेने तर्फे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.  युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्या आदेशानुसार यवतमाळ जिल्ह्यातील युवासेना विस्तारक दिलीप घुगे, शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांच्या मार्गदर्शनात युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत चचडा, व उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. दरम्यान आंदोलन कर्त्यांनी शिवतीर्थावर जोरदार घोषणा देत कोश्यारी यांचा निषेध केला.
यावेळी सतिश वारटे युवासेना जिल्हा समन्वयक, चंद्रकांत गुगुल, निलेश बेलेकर, दिपानकर वनकर, विक्रम कुलकर्णी, राकेश माकडे, महेश चौधरी, मंगल भोंगरे, मोंटू वाधवानी, बंटी येरणे, कुणाल लोणारे, प्रफुल बोरडे, अमृत फुलझले, सचिन पाटील, माकबूल शेख, शकील सिद्दीकी, रिंकू पठाण, शिवा शर्मा, पवन खुळसंगे, प्रवीण वरारकर, युवासेना पदाधिकारी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यपाल कोश्यारी यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, असं म्हणत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, राज्यपालांनी महाराष्ट्रा, मराठी माणसाची ची माफी मागावी अशी मागणी वणीत युवासेनेकडून स्वाक्षरी मोहीम राबवून करण्यात आली आहे.

वृद्ध महिलांनी साजरा केला माननीय आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस

सह्याद्री चौफेर | न्यूज 

चंद्रपूर : महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री माननीय आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा दिनांक 30 जुलै रोजी जुनी पडोली येथील वृद्ध महिलांनी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

या निमित्ताने माननीय आमदार श्री.सुधीरभाऊ मनमंदिर यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या यावेळी या महिलांना श्री.अनिल डोंगरे प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र यांच्या कडून मा.सुधीरभाऊ यांच्या वाढदिवसाची भेट म्हणून त्यांना साडी चोडी देण्यात आली.

या कार्यक्रमाला श्री विजय माशिरकर, श्री. विकी लाडसे सरपंच पडोली,श्री निशिकांत पिसे ग्राम पंचायत सदस्य, श्री.विनोद खडसे तालुका सचिव भाजपा, सौ. छायाताई उईके ग्रामपंचायत सदस्य, श्री बंडू जोगी, श्री मंगेश चौधरी हे उपस्थित होते.