मा.आ.श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे वाढदिवसानिमित्त ग्रामीण भागातील शाळेतील 1 ते 7 वर्गातील विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप व निराधार आशा वर्कर महिलांना साडी भेट

सह्याद्री चौफेर | न्यूज 

चंद्रपूर : महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री मा. आ.श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून श्री अनिल डोंगरे प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र यांच्या माध्यमातून सेवाभावी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामधील ग्रामीण भागातील भटाळी,पायली,चिचोली,वडोली,छोटा नागपूर,मोरवा,जुनी पडोली,यशवंत नगर,पडोली फाटा,लखमापूर चांदसूर्ला, विचोडा इत्यादी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पहिली ते सातवी वर्गातील विद्यार्थ्यांना दोन ते तीन नोटबुक याप्रमाणे वाटप करण्यात आले. तसेच गरीब निराधार महिला अशा वर्कर महिला यांना मा. सुधीर भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त साडी भेट देण्यात आले.
या कार्यक्रमाला सो.शोभाताई पिदुरकर जिल्हा उपाध्यक्ष भाजपा महिला आघाडी, श्री सुभाष गौरकर, सौ दुर्गा बावणे तालुका महामंत्री भाजपा महिला आघाडी, सौ.अनिता भोयर तालुका अध्यक्ष महिला आघाडी, श्री. अजय चालेकर, श्री.विजय माशिरकर, श्री.विनोद खडसे, श्री.विक्की लाडसे सरपंच, श्री.राकेश गौरकार सरपंच, श्री निशू पिसे, श्री.राजेश कुबेर,
सौ.माधुरी सागौरे सरपंच, सौ कल्पना गुन्हे, सौ.संगीता हेलवडे, सौ. छायाताई उईके, सौ.प्रतिभा पत्रकार, सौ.सुनिता पिंपलकर, सौ.अंनु ठेंगणे, सौ.कांता खोबरागडे, श्री.शंकर खांडारकर, श्री.अशोक पटेल, श्री.महादेव पिदुरकार, श्री.नानाजी थेरे, श्री.अर्जुन नागरकार., श्री.सुदर्शन निषाद, श्री. विठ्ठल थेरे, यांची उपस्थिती होती.