रामनवमी उत्सव समितीच्या वतीने भव्य नेत्रदान शिबिर संपन्न


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : श्री राम जन्मोत्सव समितीच्या वतीने या वर्षी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये नेत्र चिकित्सा शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.आज दि. ८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता श्रीविनायक मंगल कार्यालय गणेशपुर येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी नगराध्यक्ष तारेन्दं बोर्डे यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष विजय चोरडिया, राजाभाऊ बिलोरीया, श्याम बडगरे, अजिंक्य शेंडे, अरुण कावडकर, रमेश बिलोरीया, महाविर कटारीया हे उपस्थित होते.
या नेत्र चिकित्साशिबिरात ३०० रुग्णांची तपासणी करून त्या पैकी १५० रूग्णांना चश्षम्याचे निशुल्क पाटप करण्यात आले. ९६ रूणांना आय ड्रापचे वाटप करण्यात आले व उर्वरित ५४ रूग्णांना ऑपरेशन साठी कस्तुरबा हॉस्पिटल्स सेवाग्राम येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच रक्तदान शिबिरात ५६ रक्तदात्यांनी रक्तदान करून विक्रमाची नोंद केली.
या शिबिरात सर्व रूग्नांना,व रक्त दात्यांना समिती तर्फे भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.शिबिर यशस्वीतेसाठी श्री रामनवमी उत्सव समितीचे अध्यक्ष विजय चोरडिया यांनी व त्यांच्या टिमने मोलाचे सहकार्य केले.

कुलसंगे यांच्या उपोषणाचा सहावा दिवस : विविध संघटननांनी भेट देऊन दिले समर्थन

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

गडचिरोली : राष्ट्रीय वीर बाबुराव शेडमाके स्मारकाचे झालेले नुकसान त्वरीत दुरुस्त करुन देण्यात यावे या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेले गडचिरोली येथील सुपरिचित सामाजिक कार्यकर्ते वसंतराव कुलसंगे यांना काल दिनांक ०५ एप्रील २०२२ रोजी प्रकृती खालावल्यामुळे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी कुलसंगे यांच्यावर उपचार केल्याने त्यांची प्रकृती आता स्थिर आहे .
            
दरम्यान गडचिरोली येथिल प्रसिद्ध सामाजिक कायकर्ते डॉ.शिवनाथ  कुंभारे सर, गुरुदेव सेवा मंडळचे पंडीत पुडके सुखदेव वेठे, विविध सामजिक संघटनांच्या महिला कार्यकर्ता रुग्णालयात जाऊन वसंत कुलसंगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

तसेच या संपू्र्ण उपोषणाला व कुलसंगे यांनी केलेल्या मागणीला संपूर्ण समर्थन जाहिर केले. कुलसंगे यांनी शासनापुढे मांडलेल्या मागणीचा पाठपूरावा करण्यासाठी गडचिरोली शहरातील तथा जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, राजकिय संघटना ह्या एकवटलेल्या असून या येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार या वेळी सर्व कार्यकर्तांनी व्यक्त केला.
        
विशेष म्हणजे चामोर्शी रोडवरील वीर बाबुराव शेडमाके स्मारकाची नासधूस राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने तीन महिन्यापूर्वी केली होती आणि त्यामुळे हे स्मारक मोडकळीस आले असुन कोणत्याही क्षणी कोसळू शकते व असे जर झाले तर त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये मनुष्य हानी व वित्त हानी होऊ शकते. त्यामुळे या स्मारकाची त्वरीत दुरुस्ती करणे आवश्यक आहे. म्हणुन कुलसंंगे यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयासमोर उपोषण सुरु केले होते. चार दिवस उपोषणाला बसल्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांच्या सल्यानुसार त्यांना शासकीय रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले आहे. 

राष्ट्रीय वीर बाबुराव शेडमाके यांच्या गडचिरोली -चामोर्शी महामार्गावरील स्मारकांचे राष्ट्रीय महामार्ग विभागाद्वारे प्रचंड नुकसान कलेल्या ठिकाणास गडचिरोलीचे सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. शिवनाथ कुंभारे साहेब, माजी आमदार आनंदराव गेडाम साहेब, गुरुदेव सेवा मंडळाचे पंजीत पुडके साहेब, वेठे साहेब , जेष्ठ पत्रकार रोहीदास राऊत सर इत्यादी सामाजिक तथा राजकिय कार्यकर्त्यांनी घटनास्थळालाा प्रत्यक्ष भेट दिली. तसेच शहिद वीर बाबुराव शेडमाके स्मारकाच्या नुकसानग्रस्त भागाची पाहनी करुन त्यावर सविस्तर चर्चा केली.        
(शासकिय रुग्णालयात उपोषणादरम्यान उपचार घेतांना वसंतराव कुलसंगे साहेब)

त्याचप्रमाणे स्मारकाच्या नुकसान भरपाईसाठी मा.वसंतरावजी कुलसंगे यानी दिनांक ४ फेब्रुवारी २०२२ पासून केलेल्या आमरण उपोषणास संपूर्ण समर्थन दर्शवून पूर्ण पाठींबा दर्शविला आहे. उपोषणाच्या ४ थ्या दिवसी डॉक्टरांच्या सल्याने व पोलीस प्रशासनाच्या मदतीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याबाबत शारीरीक प्रकृतीची चौकशी केली. 
        
त्याचप्रमाणे शहिद स्मारकाच्या नुकसानग्स्त भागाची पूर्ववत बांधनी करण्यासाठी शासन तथा प्रशासनाकडे पाठपूरावा करणार असल्याचेही सांगीतले.

"जो पर्यंत शहिद स्मारकाच्या नुकसानग्रस्त भागाची पूर्ववत पायाभरणी करणार नाही तो पर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा निर्धार राष्ट्रीय वीर बाबुराव शेडमाके आदिवासी विकास प्रबोधन समीतीचे संस्थापक अध्यक्ष मान. वसंतराव कुलसंगे यानी निर्धार केला आहे."

नरसाळा जि.प.शाळेत मध्यान्ह भोजन योजना सुरु


विवेक तोडासे | सह्याद्री न्यूज 

मारेगाव : राज्यात 'मिड डे मिल' (मध्यान्ह भोजन) योजना विद्यार्थ्यांसाठी सुरू झाली. शाळेत कोणतेही मूल कुपोषित राहू नये, विद्यार्थ्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी, यासाठी ही योजना सुरू झाली होती. मात्र कोरोना काळात मध्यान्ह भोजन बंद होते. परंतु आता मात्र, कोरोना संसर्ग ओसरल्याने शाळा सुरु झाल्या शिवाय मध्यान्ह भोजन विद्यार्थ्यांना शाळेत मिळू लागले.
महाराष्ट्र शासनाकडून शालेय पोषण योजने अंतर्गत मध्यान्ह भोजन योजना राबविण्यात येत असून सदर योजना ही दिनांक 15 मार्च 2022 पासून शासन आदेशान्वये सुरु करण्यात आली. परंतु शाळेला धान्य पुरवठा नसल्याने ही योजना बंद होती. मात्र, 31 मार्च 2022 ला धान्य पुरवठा शाळेला उपलब्ध झाल्यामुळे दि.1 एप्रिल 2022 पासून मध्यांन्ह भोजनाला सुरुवात झाली आहे.
त्यामुळे शाळेत विद्यार्थी संख्येत वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहेत.

नरसाळा येथील नवनिर्वाचित शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हे भोजन आहारावर लक्ष केंद्रित करून प्रत्यक्ष शालेय भोजनाची तपासणी करून त्याचा स्वाद तपासून पाहत आहेत तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका ह्या सुद्धा भोजन आहारात काही कमी राहू नयेत म्हणून काळजी घेताना दिसत असून, येथील सर्व शिक्षकवृंद विध्यार्थ्यांना भोजन आहार उत्तम प्रकारचे मिळण्यासाठी प्रयत्नात असतात.

अखेर त्याला अमरावतीच्या वडारपुऱ्यातून केली अटक

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : गेल्या दीड वर्षापूर्वी एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळून नेणाऱ्या आरोपीला मारेगाव व अमरावती येथील फैजपूरा पोलीस स्टेशनच्या पथकाने व पोलिस अधिकारी यांच्या साह्याने अमरावतीमधील वडारपुरा येथून मोठ्या शिताफीने अटक करण्यात आले.

मारेगाव पोलिसांना मिळालेल्या माहिती नुसार दीड वर्षापूर्वी मारेगाव शहरातील एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीचा पोलिस तपास करीत असताना आरोपी संतोष दत्ता चौगुले (24)  रा. मारेगाव हा कोरोनाकाळापासून पोलीसांना चकमा देत होता त्यामुळे पोलिसांच्या हाती अपयश येत होते.

अचानक मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनात पथक नेमून यामध्ये ए एस आय ताजणे, प्रमोद जिडेवार, अजय वाभीडकर, रजनीकांत पाटील, यांचे पथक तयार करून अमरावती येथे पाठवण्यात आले. मोबाईलचे लोकेशन मिळत नसल्यामुळे अनेक प्रकारच्या कसरती चा सामना पोलिसांना करावा लागत असताना अखेर वडारपुऱ्यात दीड वर्षापासून भाड्याचे रूम करुन राहत असणाऱ्या ठिकाणावरून अमरावती पोलीस व मारेगाव पोलीस यांचे संयुक्त कारवाई करून आरोपीला अटक करण्यात आले. आरोपी विरोधात अपराध क्रमांक 322,20, विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आला.

सदर आरोपी गजाआड असून घटनेचा अधिक तपास  पोलीस करीत आहे.

वसंत कुलसंगे उपोषणाचा चौथा दिवस; प्रकृती खालावली - प्रशासनाचे दुर्लक्ष


सह्याद्री चौफेर | न्यूज 

गडचिरोली : चामोर्शी रोडवरील वीर बाबुराव स्मारकाची त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी साठी येथील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयासमोर या मागणी चे तीन दिवसापासून आमरण उपोषणास बसले आहेत वसंत कुलससंगे यांचे उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे.

या उघोषणामुळे कुलसंगे यांची प्रकृती खालावली असून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आज दुपारी त्यांची तपासणी केली.

उपोषणाचा चौथा दिवस असूनही प्रशासनातर्फे त्यांच्या मागणीची अजून पर्यंत काहीच दखल घेतलेली नाही. मात्र, वीर बाबुराव स्मारकाची दुरुस्ती होई पर्यंत आपण उपोषण मागे घेणार नाही असा निर्धार कुलसंगे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, आदीवासी समाजाच्या विवीध संघटना व कार्यकर्त्यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आपला पाठींबा जाहीर केला आहे. काल या कार्यकत्यांनी जिल्हाधिकारी ग गडचिरोली यांना निवेदन सुध्दा सादर केले. गोंडवाना गणतंत्र पार्टी, अखील भारतीय आदिवासी विकास परिषद गडचिरोली, बिरसा क्रांती दल, गोंडवाना गोटूल समिती आदिवासील महीला परिषद इ. संघटनांचा त्यात समावेश होता. 

वीर बाबुराव स्मारकाचे कंत्राटदाराने केलेल्या नुकसानीचा तीव्र निषेध करून या स्मारकाची त्वरीत दुरुस्ती करून द्यावी अशी मागणी केली आहे. तसेच स्मारकाचे नुकसान करणारे कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशीही भागणी केली आहे. दरख्यात अखील भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यास रोहिदास राऊत, जिल्हा सरचिटणीस हंसराज उंदिरवाडे, आदिवासी युवा परिषदेचे कुणाल कोवे, सुरज मडावी, लोमेश गेडाम, माजी नगरसेविका वर्षात ताई शेडमाके, माझी पोलीस निरीक्षक शिवराम कुमरे, मंजुळाताई पुढे, मनीराम दुग्गा व अन्य कार्यकर्ता. यांनीही उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा दिला.